धक्कादायक! खड्ड्यांमुळे रिक्षातच प्रसूती; भिवंडीत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

Pregnant Woman Gives Birth In Auto Due To Potholes In Bhiwandi: भिवंडीतील खड्डेमय रस्त्यांमुळे गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला आणि रिक्षामध्येच प्रसूती झाली. आई आणि बाळ सुरक्षित असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nagpur protest at Golibar Chowk as Halba community members demonstrate against Tukaram Mundhe’s alleged remarks.
Nagpur protest at Golibar Chowk as Halba community members demonstrate against Tukaram Mundhe’s alleged remarks.saam tv
Published On

फैय्याज शेख, साम टीव्ही

भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात नेत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास विलंबला आणि अखेर कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झाली. सुदैवाने आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून या घटनेने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भिवंडी शहरातील अजमेर नगर परिसरात राहणाऱ्या वर्षा कमलेश यादव यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रिक्षातून भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षाला अत्यंत संथगतीने प्रवास करावा लागला. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारा प्रवास तब्बल अर्धा ते पाऊण तास चालला. रस्त्यातील धक्के आणि खड्ड्यांमुळे प्रसूती वेदना तीव्र झाल्याने कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच वर्षा यादव यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर तातडीने आई आणि नवजात बाळाला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nagpur protest at Golibar Chowk as Halba community members demonstrate against Tukaram Mundhe’s alleged remarks.
पुणे पोलीस आयुक्तांची धडक कारवाई; खडक पोलीस स्टेशनचं तपास पथक बरखास्त, नेमकं काय आहे प्रकरण?

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघात, वाहतूक कोंडी आणि आता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रिक्षातच झालेली प्रसूती या घटनांमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डेमुक्त भिवंडी करण्याची मागणी केली असून, आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com