

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडक कारवाई केली.
खडक पोलीस स्टेशनचे संपूर्ण तपास पथक बरखास्त करण्यात आले.
पुणे पोलीस दलात मोठी खळबळ
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबार प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी धडक कारवाई केली आहे. खडक पोलीस स्टेशनमधील अख्खं तपास पथकच बरखास्त करण्यात आलंय. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या कारवाईमुळे पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडालीय.
पंधरा दिवसापूर्वी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका दिवशी दोन वेळा फायरिंग झाली होती या फायरिंगच्या घटनांनंतर आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट कारवाई करत तपास पथक बरखास्त करण्यात आलंय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करत ३९ पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या असून त्याचे आदेशही जारी केलेत.
या बदल्यांमध्ये सर्वाधिक फटका खडक पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि विशेषतः गुन्हे शाखेच्या युनिट-१ (DB) ला बसलाय. हर्षल दुडुम, किरण ठवरे कृष्णा गायकवाड विकास पांडुळे दिनेश गायकवाड शुभम केदारी अक्षय वाबळे विश्वजीत गोरे निलेश दिवटे भाऊसाहेब सोडमिसे पांडुरंग चंदिले आणि सैपन मुलुख नदाफ यांची थेट मुख्यालयात रवानगी करण्यात आलीय.
खडक गोळीबार प्रकरणानंतर लगेचच खडक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक यांच्या तत्काळ नियंत्रण कक्षात बदल्या करण्यात आल्या होत्या. खडक पोलीस ठाण्यातील १२ आणि २७ जणांच्या बदल्या गुन्हे शाखेतील झाल्या आहेत.खडक परिसरातील गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाने प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई केली आहे. खडक पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हलविले आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्यात. तर काहींना मुख्यालयात, तर काहींना शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.