Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

mumbai goa highway traffic jam near pen : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

सचिन कदम, पेण | साम टीव्ही

विकेंड किंवा सलग लागून आलेल्या सुट्ट्यांच्या काळात पर्यटकांच्या वाहनांमुळं होणाऱ्या वाहतूक कोंडींचा प्रश्न कमी म्हणून की काय आता इतर दिवशीही मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज, बुधवारी प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळाली. पेणजवळच्या बळवली दूरशेत परिसरात वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. बळवलीजवळून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. वाहतूक प्रचंड संथगतीने सुरू होती. डंपर, ट्रक आणि कंटेनरमुळं इतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढला असून, वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com