New Year Celebration: थर्टी फस्टची तयारी, नववर्षाचे स्वागत.. पर्यटनस्थळे, देवस्थाने गर्दीने फुलली!

31st And New Year Celebration: सरत्या वर्षाला निरोप द्यायला अन् नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे गर्दीने फुलून गेली आहेत.
31st New Year Celebration
31st New Year CelebrationSaamtv
Published On

New Year Celebration 2024:

सरत्या वर्षाला निरोप द्यायला अन् नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे गर्दीने फुलून गेली असून प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करताना दिसत आहे. राज्यातील पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण प्रवासाला पसंदी दर्शवली असून मोठ्या संख्येने लोक कोकणात दाखल होत आहेत. तसेच कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, शिर्डी साईबाबांचे देवस्थानही भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेले आहे.

कोकणात पर्यटकांची गर्दी..

थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. मुंबईतून बोटीने अलिबागला (Alibag) येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून मांडवा जेट्टीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता जादा बोटी सोडण्यात येत आहेत. रो रो सेवेच्या फेऱ्यादेखील वाढवण्यात आल्या आहेत.

गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आणि मेरी टाईम बोर्ड समन्वयाने काम करीत आहे. सोमवारी परतीच्या प्रवासात गर्दी नियंत्रणासाठी जेटीवर बॅरीगेटींग करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

31st New Year Celebration
Washim News: 'धुंदीत नव्हे, शुध्दीत नववर्षाचे स्वागत करा...' वाशिममध्ये NCC विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

महाबळेश्वर गर्दीने फुलले...

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेले महाबळेश्वरमध्येही (Mahabaleshwar) सर्वत्र पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन साठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक, मॅप्रो गार्डन, जुनं महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई देवीची जगभर ओळख आहे. पर्यटक, भाविकांनी पहाटेपासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

31st New Year Celebration
Mumbai News: स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो, शहरात राबवली जाणार अर्बन फॉरेस्ट संकल्पना: मुख्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com