Myanmar Army Soldier: म्यानमारचे सैनिक आले भारताच्या आश्रयाला, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

Myanmar Army Soldier News: गृहयुद्धामुळे म्यानमारमधील परिस्थिती चिघळली आहे. एका सशस्त्र गटाने शनिवारी हल्ला करून सैन्य तळ ताब्यात घेतल्यामुळे म्यानमारचे १५१ सैनिक भारताच्या आश्रयाला आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच सीमेलगतच्या हजारो नागरिकांनी भारतात आश्रय घेतला होता.
Myanmar Army Soldier
Myanmar Army SoldierSaam Digital
Published On

Myanmar Army Soldier

गृहयुद्धामुळे म्यानमारमधील परिस्थिती चिघळली आहे. एका सशस्त्र गटाने शनिवारी हल्ला करून सैन्य तळ ताब्यात घेतल्यामुळे म्यानमारचे १५१ सैनिक भारताच्या आश्रयाला आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच सीमेलगतच्या हजारो नागरिकांनी भारतात आश्रय घेतला होता. मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात या सैनिकांनी शरण घेतली असून आसाम रायफल्सने त्यांना ताब्यात घेतलं आहे.

म्यानमारचं लष्कर आणि अरकान बंडखोरांच्या सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी झडत आहेत. शुक्रवारी मिझोराममध्ये घुसलेले काही सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आसाम रायफलच्या जवानांनी उपचार केले आहेत. त्यांना परवा येथे आसाम रायफल्सच्या सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारचे सरकार याच्यात चर्चा सुरू असून म्यानमारच्या सैनिकांना लवकरच मायदेशात पाठवण्यात येईल, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Myanmar Army Soldier
Indonesia Earthquake: शक्तिशाली भूकंपाने इंडोनेशिया हादरलं, त्सुनामी येणार का? काय आहे वैज्ञानिकांचा अंदाज?

नोव्हेंबच्या सुरुवातीला देखील पीपल्स डिफेन्स फोर्सने म्यानमार भारत सीमेवरील लष्करी छावण्यांवर हल्ले करत ताबा मिळवला होता. त्यावेळी १०४ सैनिक भारतात आश्रयासाठी आले होते. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पारावाजवळील म्यानमारच्या लष्करी तळावर गुरुवारी म्यानमार पीपल्स आर्मी आणि चीन नॅशनल आर्मीने हल्ला करत लष्करी छावण्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर सैनिकांनी तेथून पळ काढला. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून टुयसेंटलॉंग गावात ते पोहोचले. तेथून आणखी काही सैनिक भारतात दाखल झाले आहेत.

Myanmar Army Soldier
China Red Army: रेड आर्मीचे ९ वरिष्ठ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ? काय आहे ड्रॅगनची रणनीती? जगाच्या नजरा खिळल्या चीनवर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com