Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंचं वादळ राजधानीत धडकणार! अंतरवाली सराटी ते मुंबई; असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Manoj jarange Patil Mumbai Protest Schedule: सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये मराठ्यांना न्याय मिळेल असं चित्र दिसत नसल्यानं मनोज जरांगे यांनी आता चर्चा नाही तर कृती करा म्हणत काहीही होवो मुंबईत येणारच अशी घोषणा केली आहे. कसे असेल मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर.

डॉ. माधव सावरगावे

Manoj Jarange Patil Mumbai Protest:

मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची वाटचाल उद्यापासून मुंबईकडे होणार आहे. २३ डिसेंबर २०२३ रोजी घोषणा करून २० जानेवारीपर्यंत सरकारला कुणबी आरक्षण द्या नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.

मात्र, सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये मराठ्यांना न्याय मिळेल असं चित्र दिसत नसल्यानं मनोज जरांगे यांनी आता चर्चा नाही तर कृती करा म्हणत काहीही होवो मुंबईत येणारच अशी घोषणा केली आहे. कसे असेल मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर.

अंतरवाली सराटी ते मुंबई, पाहा संपूर्ण वेळापत्रक...

उद्यापासून (20, जानेवारी) अंतरवाली सराटीतून (Antarvali Sarati) या पायी यात्रेला सुरुवात होईल. सकाळी नऊ वाजता पायी चालत काही अंतर कापले जाईल त्यानंतर वाहनातून प्रवास सुरू होईल. त्यासाठी मराठवाड्यातून हजारो वाहन या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. पायी येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असू शकते असा अंदाज आहे.

पहिला दिवस (२० जानेवारी):- अंतरवाली ते मातोरी

अंतरवालीतून सकाळी ९ वाजता मुंबईकडे रवाना होतील. त्यानंतर पहिल्या दिवशी कोळगाव (ता. गवराई) येथे दुपारचे जेवण होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा)

दुसरा दिवस (21 जानेवारी) - मातोरी ते करंजी बाराबाभळी

मातोरीतून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम / जेवण व जेवण असेल.

तिसरा दिवस (22 जानेवारी) - बाराबाभळी ते रांजणगाव

बाराबाभळीतून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर सुपा (ता. पारनेरे) येथे दुपारी जेवण व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौथा दिवस (२३ जानेवारी) : रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास.

रांजणगावातून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर कोरेगाव भिमा येथे दुपारचे जेवण व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे)

पाचवा दिवस (२४, जानेवारी): खराडी बायपास ते लोणावळा

चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा)

२५ जानेवारी रोजी

सहावा दिवस (२५ जानेवारी): लोणावळा ते वाशी

लोणावळ्याहून सकाळी ८ वाजता मराठा बांधवांच्या पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे - नवी मुंबई)

सातवा दिवस (२६ जानेवारी): वाशी ने मुंबई आजाद मैदान-मुंबई!

वाशीतून सकाळी ८ वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे. पण सरकारमधील काही मंत्री, काही लोक ट्रॅप लावला आहे असा थेट आरोप म्हणून जरांगे पाटील यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमधील ४० मंडळांवर कारवाई

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात ही एक वस्तु दान करा; पैशांची तंगी आणि पितृदोष होतील दूर

Maratha/OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरवर भुजबळांची अॅक्शन, थेट फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप, वाचा सविस्तर

Weight Loss Tips : हे कडधान्य रोज रात्री भिजवून खा अन् वजन कमी करा

Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

SCROLL FOR NEXT