मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. या दरम्यान जरांगे पाटलांचे सहा ठिकाणी मुक्काम होणार आहेत. यादरम्यान जरांगे पाटलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील मराठा समन्वयकांनी जरांगेंसाठी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. अत्याधुनिक अशी विविध सुविधा असलेली ही व्हॅन असून यामध्ये एसी पासून ते वाशरूम, बाथरूम, छोटा फ्रिज, मायक्रोवोहनसह टीव्ही देखील असणार आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांसह उद्या २० जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या देशाने निघणार आहेत. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत अंतिम तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईत पायी येण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र यामुळे मुंबईत अडचण होईल. मिनिटावर चालणारी मुंबई यामुळे थांबू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रोटोकॉल सोडून त्यांच्या आंदोलनाजवळ गेले. अनेक मंत्री देखील गेले. मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे ते मुंबईत येणार आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठा आक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २० जानेवारीपर्यंतची डेटलाईन दिली असून काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिष्टमंडळासोबतची चर्चा फिस्कटली असून मनोज जरांगे पाटील २० जानेवारीला मुंबईत जाण्यावर ठाम आहेत.
७ हजार गावांमध्ये अद्यापही कुणबी नोंदी तपासायच्या राहिल्या आहेत. हा विषय गॅझेटमध्ये समोर आला आहे. त्यामुळे तुम्ही मध्यस्थी करून २० तारखेपर्यंत 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी त्यांनी बच्चू कडूंकडे लावून धरली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.