Nana Patole News: 'पंतप्रधान कमी अन् प्रचारक जास्त...' PM मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन कॉंग्रेसचे टीकास्त्र

Nana Patole on PM Narendra Modi: डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना ही योजना मंजूर झाली होती. त्याच योजनेच्या आज नरेंद्र मोदी चाव्या द्यायला आले, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.
Nana Patole on PM Narendra Modi
Nana Patole on PM Narendra ModiSaamtv
Published On

Nana Patole Press Conference:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. गेल्याच आठवड्यात पंतप्रधानांनी मुंबई दौरा केला होता, त्यानंतर आता पुन्हा ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याने ही लोकसभा निवडणुकांची तयारी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

"आगामी निवडणुकांमध्ये भाजपची (BJP) हार निश्चित आहे. महाराष्ट्र भाजपसाठी कमजोर झालं आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला येत आहेत, ते पंतप्रधान कमी आणि प्रचारक म्हणून जास्त काम करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली. तसेच देशात संविधान आणि लोकशाही संपली तेव्हा महाराष्ट्राने ताकद दिली आहे, संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचे काम भाजप करत आहे," असेही नाना पटाले (Nana Patole) यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांवर निशाणा...

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी मोदी गॅरंटीवरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला. "डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना ही योजना मंजूर झाली होती. त्याच योजनेच्या आज नरेंद्र मोदी चाव्या द्यायला आले. त्यांना त्यासाठी दहा वर्षे लागले. भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे पंतप्रधानांनी खोटे बोला, पण रेटून बोलावं असं करू नये," असे ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nana Patole on PM Narendra Modi
Ram Shinde News: महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर...;लोकसभेच्या जागेवरून राम शिंदेचा सुजय विखे पाटीलांना टोला

एक दिवस भूकंप करुन दाखवू..

पुढे नाना पटोले यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन मोठे विधान केले. "भाजपमधील खदखद आमच्यापर्यंत पोहोचतं आहे. योग्य वेळी त्याचा प्रॉपर पोस्टमार्टम करू. यांना रोज रोज छोटे हातोडे मारू द्या. आम्ही एकच मोठा हातोडा मारू आणि त्या दिवशी यांना कळून जाईल. रोज भूकंपाच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही तो भूकंप एका दिवसात करून दाखवू..." असा सूचक इशारा त्यांनी दिला. (Latest Marathi News)

Nana Patole on PM Narendra Modi
Jalgaon Accident : पुलाचा कठडा तुटून विटांचा ट्रक पलटी; एका मजुराचा मृत्यू, तीन मजुर गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com