Pune News : पाळीव कुत्र्यासाठी केला ३५ तासांचा प्रवास, यशस्वीरित्या उपचार करत वाचवला जीव

Pet Dog Detected Cancer : देहरादून येथील साडेबारा वर्षाच्या कुत्र्याला डाव्या पायाला हाडांच्या (ऑस्टिओसारकोमा) कर्करोगाचे निदान झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी देहरादून ते पुणे असा ३५ तास रोडने प्रवास करत पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिक येथे दाखल केले.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

Pet Dog Injured :

देहरादून येथील साडेबारा वर्षाच्या कुत्र्याला डाव्या पायाला हाडांच्या (ऑस्टिओसारकोमा) कर्करोगाचे निदान झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी देहरादून ते पुणे असा ३५ तास रोडने प्रवास करत पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिक येथे दाखल केले.

भारतातील आघाडीचे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली रीना हरिभट, (पशुवैद्यकीय सहाय्यक), पूजा बहोत आणि डॉ. ज्योती परदेशी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत बादल या साडेबारा वर्षाच्या कुत्र्याला वाचविण्यात यश आले आहे. कर्करोगामुळे हा कुत्रा लंगडू लागला होता आणि त्यासाठी पाय कापणे आवश्यक होते. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २४ तासातच बादल पुन्हा चालू लागला असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

मानवांप्रमाणेच पाळीव प्राण्यांमध्ये देखील कर्करोग (Cancer) ही एक सामान्य समस्या ठरत आहे. डेहराडून येथील कांचन खांडके यांच्या साडेबारा वर्षीय कुत्र्याला हाडांच्या कर्करोगाचे निदान झाले होते. कांचन या डेहराडुन येथील शाळेच्या मुख्याध्यापिका असून त्या मुळच्या पुण्याच्या (Pune) होत्या. १२ वर्षांपुवी त्या राजस्थानला स्थलांतरीत झाल्या आणि तिथे त्यांनी २१ कुत्र्यांची सुटका केली आणि त्यांची योग्य काळजी (Care) घेतली.

Pune News
Jio ची खास ऑफर! 56GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग्सह ३ महिने फुकटात पाहाता येईल Disney + Hotstar

२०२२च्या उत्तरार्धात, त्यांनी वाचविलेल्या पाळीव प्राण्यांपैकी बादल या कुत्र्याला चालताना त्रास होऊ लागला व तो लंगडत चालू लागला होता. त्याला इंजेक्शन देण्यात आले परंतु त्याची प्रकृती सुधारली नाही. मे २०२३ मध्ये कांचन पुन्हा राजस्थानहून डेहराडूनला स्थलांतरित झाल्या. ऑगस्ट २०२३ च्या अखेरीस, बादल पूर्णतः लंगडत चालू लागला. कांचन खांडके यांना बादलच्या तब्येतीबाबत चिंता वाटू लागली.

कांचन यांनी बादलला स्थानिक पशुवैद्यकाकडे नेले आणि त्याचा एक्स-रे काढला. त्यात कॅन्सरची शक्यता वर्तविण्यात आली. कर्करोगासाठी बायोप्सीसारख्या विस्तृत चाचणीची आवश्यकता होती. डॉ परदेशी हे गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या कुटुंबाचे पशुवैद्यक आहेत, म्हणून मी त्यांना डेहराडूनला भेट देऊन बादलच्या प्रकृतीचे मूल्यांकन करण्यास सांगितले.

ऑक्टोबर २०२३ मध्ये तपासणी आणि FNAC चाचणीसह अनेक चाचण्या केल्या ज्यात ट्यूमरचे निदान झाले. या निदानानंतर, मी बादलसोबत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. डेहराडून ते पुणे या प्रवासाला चार दिवस लागले त्या दरम्यान ठराविक ठिकाणी थांबत ३५ तास गाडी चालवत प्रवास केल्याचे कांचन खांडके यांनी स्पष्ट केले.

Pune News
कडाक्याच्या थंडीत वाढू शकतो High Blood Pressure, या टिप्स लक्षात ठेवाच!

डॉ नरेंद्र परदेशी, स्मॉल अॅनिमल क्लिनिक, पुणे येथील भारतातील अग्रगण्य पशुवैद्यकीय सर्जन सांगतात की बादलला प्रगत ऑस्टियोसारकोमाचे निदान झाले होते, जो पायाच्या खालच्या भागात उद्भवला होता आणि तो वरच्या भागात पसरत होता. कुत्र्यांमधील ऑस्टिओसारकोमा हा एक वेगाने वाढणारा असा हाडांचा कर्करोग आहे ज्यास यशस्वी उपचारांची आवश्यकता आहे.

या प्रकारचा कर्करोग पायांवर परिणाम करतो. पाळीव प्राण्यांमध्ये लंगडत चालणे किंवा सूज येण्याच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका असेही डॅा परदेशा यांनी स्पष्ट केले. कुत्र्यांमधील कर्करोगाचा प्रसार त्यांची जात, वय आणि इतर घटकांनुसार बदलत असतो. सामान्यतः, कर्करोग हे वृद्ध कुत्र्यांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. सुमारे ४ पैकी १ कुत्र्याला त्यांच्या कर्करोगाचा धोका असतो. अनुवांशिक कारणांमुळे विशिष्ट जातींना विशिष्ट प्रकारचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. ऑस्टियोसारकोमा हा हाडांच्या कर्करोगाचा एक प्रकार, कुत्र्यांना प्रभावित करतो आणि त्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ऑस्टियोसारकोमाच्या विकासामध्ये अनेक घटक योगदान कारणीभूत ठरतात त्यापैकी एक म्हणजे आनुवंशिकता. ग्रेट डेन्स, सेंट बर्नार्ड्स आणि ग्रेहाऊंड्स सारख्या काही जातींमध्ये ऑस्टिओसारकोमा होण्याची शक्यता अधिक असते. यास कारणीभूत इतर घटक म्हणजे वाढते वय, हाडांचे विकार आणि आघात.

Pune News
Railway Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत ५,९६९ पदांसाठी जागा रिक्त, कसा कराल अर्ज?

देहरादूनमध्ये रक्त चाचण्या, सीटी स्कॅन आणि बायोप्सी यांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक मूल्यांकनानंतर, कर्करोगाच्या निदान झाले. त्यानंतर पाळीव प्राण्याला इतर आरोग्य समस्यांचे मूल्यांकन करण्यासाठी एक्स-रे आणि सीटी स्कॅनसह पुढील चाचण्यांसाठी पुण्याला नेण्यात आले आणि बादलला पाय कापण्याचा सल्ला देण्यात आला.

डॉ नरेंद्र परदेशी पुढे सांगतात की, त्याच्या डाव्या पायावर ऑस्टिओसारकोमासाठी एक विच्छेदन शस्त्रक्रिया ९ जानेवारी, २०२४ रोजी नियोजित होती. कुत्र्यांमधील ऑस्टियोसारकोमाच्या प्राथमिक उपचारांमध्ये अनेकदा प्रभावित अंग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जाते ज्याला अंगविच्छेदन म्हणतात. हे सामान्यतः कमी कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी केले जाते. त्यानंतर कुत्र्याच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. विच्छेदनानंतर, कुत्रे आश्चर्यकारकपणे तीन पायांच्या हालचालींशी जुळवून घेऊ शकतात.

सुमारे अडीच तास सुरु असलेली ही शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय सुरळीतपणे पार पडली. अवघ्या २४ तासांच्या आत बादल पुन्हा चालू लागला. शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्या वर्षात, कुत्र्याच्या पुनर्प्राप्तीवर लक्ष ठेवणे, योग्य औषधोपचार करणे आणि शस्त्रक्रियेनंतर सांगितल्याप्रमाणे योग्य काळजी घेणे तसेच पशुवैद्यांनी सांगितलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. वेळीच निदान हा सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय ठरतो. या संपुर्ण प्रवासात डॉ. नरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टिमने घेतलेल्या अथक परिश्रमाबाबत मी त्यांचे विशेष आभार मानते अशी प्रतिक्रिया कांचन यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com