Railway Recruitment 2024
Railway Recruitment 2024Saam Tv

Railway Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत ५,९६९ पदांसाठी जागा रिक्त, कसा कराल अर्ज?

RRB ALP Recruitment : रेल्वे भर्ती बोर्ड असिस्टंट लोको पायलटसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे असिस्टंट लोको पायलटच्या एकूण ५,९६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
Published on

Railway Recruitment 2024 Online Application Process:

सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तरुणांसाठी भरतीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे.

या भरतीची माहिती एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये (19 ते 26 जानेवारी 2024) देण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर, अर्जाची तारखी देखील RRB द्वारे घोषित केल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन (online) अर्ज प्रक्रिया २० जानेवारी २०२४ पासून सुरु होईल. अर्जाची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन माध्यमातून फॉर्म भरू शकतील. अर्ज (Application) कसा करायचा? वयोमर्यादा किती? जाणून घेऊया

1. कोणत्या पदासाठी जागा रिक्त

रेल्वे भर्ती बोर्ड असिस्टंट लोको पायलटसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे असिस्टंट लोको पायलटच्या एकूण ५,९६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

Railway Recruitment 2024
Petrol Diesel Rate (19th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

2. अर्ज कोण करु शकेल?

उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ITI डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. तसेच उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष तर कमाल ३० वर्ष असायला हवे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत देण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिकृत सूचना वाचणे गरजेचे आहे.

3. निवड कशी केली जाईल?

  • कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -१ (CBT)

  • कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -२ (CBT)

  • कम्प्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट (CBAT)

  • डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन

  • मेडिकल टेस्ट

Railway Recruitment 2024
Jio ची खास ऑफर! 56GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग्सह ३ महिने फुकटात पाहाता येईल Disney + Hotstar

4. अर्जाची फी (Fees)

  • या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

  • अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

  • अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.

5. अर्ज कसा कराल?

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IndianRailways.gov.in अधिकृत साइटला भेट द्यावी.

  • अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com