Maratha Reservation: आम्ही आरक्षणावर चर्चा करत आहोत, मात्र काही जण ऐकायला तयार नाही; अजित पवारांचा जरांगेंना टोला

Ajit Pawar On Manoj Jarange Patil: आम्ही आरक्षण संदर्भात चर्चा करत आहोत, मात्र काही जण ऐकायला तयार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे.
Ajit Pawar on Manoj Jarange Patil
Ajit Pawar on Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

>> सुशील थोरात

Ajit Pawar On Manoj Jarange Patil:

आम्ही आरक्षण संदर्भात चर्चा करत आहोत, मात्र काही जण ऐकायला तयार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे. अहमदनगर येथे स्व. शिवाजीराव नागावडे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यायला ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो प्रश्न सुटावा आणि आदिवासी, ओबीसी यांना देखील कुठली भीती वाटता कामा नये. या प्रकारचे काम राज्य सरकार करत आहे. आम्ही आरक्षण संदर्भात चर्चा करत आहोत. आता संपूर्ण यंत्रणा मागास आयोगाच्या निमित्ताने सगळ्याच्या घरी माहिती गोळा करण्यासाठी येणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit Pawar on Manoj Jarange Patil
Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्याच्या सूचना

अजित पवार म्हणाले, ''त्यामुळं आता आरक्षण देताना हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात देखील टिकलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करून पुढे जातं आहे. परंतु काही जण ऐकायला तयार नाही. ते म्हणता आहे की, आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाला कुणाचा विरोध नाही. मात्र ते देत असतांना सगळ्यांनी समजूतदार पणा दाखवला पाहिजे.''  (Latest Marathi News)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. मात्र अद्याप मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला मराठा समाजाला परवानगी देण्यात आलेली नाही. जरांगे उद्यापासून मुंबईच्या दिशेने येणार असल्याचं म्हटलं आहे. उद्यापासून सुरू होणारे आंदोलन 26 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात पोहोचेल.

Ajit Pawar on Manoj Jarange Patil
Ram Murti Ayodhya: सुंदर रूप मनोहर....प्रतिष्ठापनेच्या आधी श्रीरामाचं घडलं दर्शन, पाहा 5 मिनिटांचा VIDEO

यादरम्यान जरांगे पाटलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीड मधील मराठा समन्वयकांनी पाटलांसाठी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. अत्याधुनिक अशी विविध सुविधा असलेली ही व्हॅन असून यामध्ये एसीपासून ते वाशरूम, बाथरूम, छोट फ्रिज, मायक्रोवोहन या सर्व गोष्टी त्याचबरोबर टीव्ही देखील यामध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com