HSC Exam Hall Ticket: महत्वाची बातमी! बारावी परीक्षांचे हॉल तिकीट २२ जानेवारी पासून मिळणार

HSC Board Exam 2023-24: इयत्ता बारावीच्या परीक्षाचे प्रवेश पत्र सोमवार पासून (22 जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
HSC Board Exam 2023-24 Hall Ticket Available From monday 22 January
HSC Board Exam 2023-24 Hall Ticket Available From monday 22 JanuarySaam Tv
Published On

HSC Board Exam News:

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी. इयत्ता बारावीच्या परीक्षाचे प्रवेश पत्र सोमवार पासून (22 जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सोमवारपासून ही हॉल तिकीटे विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या वेबसाईटवरुन ती मिळवण्यात येतील. यासंबंधीच्या सुचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावेत, अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट करताना ते कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता ते विद्यार्थ्यांना द्यावे, असेही शिक्षण नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे.

HSC Board Exam 2023-24 Hall Ticket Available From monday 22 January
DeadBody Bag Scam: ठाकरे गटाचा आणखीन एक नेता चौकशीच्या फेऱ्यात; पेडणेकरांना ईडीचा समन्स

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर काही बदल असतील, विषय व माध्यमांमध्ये काही त्रुटी अथवा चुका असतील तर त्याच्या दुरुस्ता विभागीय मंडळात जाऊन सुधारुन घ्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नाव, स्वाक्षरी यामध्ये दुरुस्त्या केल्यास महाविद्यालयाने त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

HSC Board Exam 2023-24 Hall Ticket Available From monday 22 January
Maratha Aarakshan Mumbai Morcha: आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाला अद्याप परवानगी नाही, पोलिसांची सावध भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com