Manoj Jarange Patil On Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; अंतरवाली सराटीत २ जणांची तब्येत खालावली

Antrvali Sarati News : अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक् मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांच्या सोबत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांपैकी दोघांची तब्येत खालावली आहे.

Saam Tv

अक्षय शिंदे, साम टीव्ही

अंतरवाली सराटीतील दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी आंतरवाली सराटीतून उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम असल्याचं बघायला मिळत आहे. त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासह इतर आठ मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्यभरातून आलेले काही मराठा बांधव आणि भगिनी देखील आमरण उपोषण साठी बसले आहे. आज तिसऱ्या दिवशी एका महिला उपोषणकर्त्याची तब्येत खालवली आहे. येरमाळा येथील मंदाकिनी बारकुल आणि बीड येथील भास्कर खांडे यांची तब्येत खालावली आहे. दरम्यान या दोन्ही उपोषणकर्त्यांना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल आहे.

मागील दोन दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंबडच्या तहसीलदारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा बांधव देखील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आज मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राबरोबरच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं.

पत्रकार परिषदेत बोलताना मनो जरांगे पाटील म्हणाले की, देशमुख कुटुंबाने उपोषणात सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मीच या बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झालं. त्यांच्या व्हायला नको. आम्ही खुनशी नाही आमची कुणाला ना नाही. आम्ही काय दहशतवादी आहे का? आम्ही जातीयवादी नाही. आम्ही लोकांवर डुक धरत नाही आमची कुणाला ना नाही, सगळं देश इथे येऊन गेला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना दिली.

तसंच मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या, गुंडगिरी संपवायची की राहू द्यायची. सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यांची गरज नाही. समाजाला शत्रू कोण हे कळणे गरजेचे आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे, हे फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT