Sambhajinagar : पोलिसांना नडला त्याला जेलमध्ये टाकला, पाहा Video

Sambhajinagar Police News : छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी अरेरावीची भाषा करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकुन त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांशी अरेरावी करून धमक्या देणाऱ्या कुणाल बाकलीवालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बांधकाम व्यवसायिक असलेल्या कुणाल बाकलीवालने शहरातील मिल कॉर्नर चौकामध्ये सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर कुणाल बाकलीवालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शिवाय, त्याची महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली आहे.

ट्राफिक पोलीस दैनसिंग जोनवाल हे सहायक फौजदार बागूल यांच्यासह २४ जानेवारी रोजी सायंकाळी संभाजीनगरच्या मिल कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते. यावेळी बाकलीवाल व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीत जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केल्याचा राग आल्याने बाकलीवाल ने चौकाच्या मधोमध गाडी थांबवली. अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत तू पहेचनता नही क्या, मै कोन हूँ असे म्हणत बागूल यांना बुढ्ढे तेरेको ड्युटी करने आती क्या, माझ्या नादी लागू नको असे म्हणत सर्वांना दोन तासांत सस्पेंड करतो असे धमकावले. त्याच्या धमकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला गेला होता. अशा पद्धतीने पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जर धमक्या दिल्या तर पोलीस अधिकारी कर्मचारी काम कसे करतील असा प्रश्न उपस्थित केला गेल्यानंतर पोलीस अधिकारी तातडीने त्याला बेड्या ठोकल्या. बडा बिल्डर, पैशाच्या माज, मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरणाऱ्या कुणाल बाकलीवालची पोलिसांना धमकी देण्याची हिमत कशी होती असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com