Dhanjay Munde Meet jarange patil 
महाराष्ट्र

Dhanjay Munde: जरांगे-मुंडेंमध्ये मध्यरात्री गुफ्तगू; पंकजा मुंडेंचा पराभव, धनजंय मुंडेंची खबरदारी

Dhanjay Munde: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज परळी वैजनाथमध्ये घोंगडी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. दरम्यान एम फॅक्टरमुळे लोकसभेत, पंकजा मुडें यांचा पराभव झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर , साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. त्यानंतर जरांगे आणि मुंडे बंधू भगिनींमध्ये शाब्दिक वॉर रंगलं होतं. त्यातच जरांगेंनी परळीतून धनंजय मुंडेंचा पराभव करण्याचा इशारा दिला. तर आता परळीतील घोंगडी बैठकीपूर्वीच मध्यरात्री धनंजय मुंडेंनी आंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं. मात्र ही चर्चा शेतकऱ्यांच्या विषयावर झाल्याची माहिती जरांगे यांनी दिलीय.

विधानसभेपूर्वी मनोज जरांगेंनी उमेदवार देण्याचं जाहीर करून महायुती आणि महाविकास आघाडीची कोंडी सुरु केलीय. त्यातच घोंगडी बैठका घेऊन वातावरण तापवलंय.. आधी अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तारांनी मध्यरात्रीच जाऊन जरांगेंची भेट घेतली आणि आता धनंजय मुंडेंनी भेट घेऊन जरांगेंसोबत चर्चा केलीय. मात्र जरागेंनी सत्तार आणि मुंडेंच नाहीतर भाजप नेतेही आपल्या संपर्कात असल्याचं म्हंटलंय.

विधानसभेपूर्वी जरांगेंनी महायुतीची डोकेदुखी वाढवलीय. त्यातच परळीत होणाऱ्या घोंगडी बैठकीपूर्वी मुंडेंनी सावधगिरी बाळगत जरांगेंची भेट घेतली आणि आश्चर्य म्हणजे परळीतील सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर थेट टीका टाळलीय. त्यामुळे मध्यरात्रीच्या भेटीत कशाची साखरपेरणी झाली? याची चर्चा रंगलीय. दरम्यान दोन्ही नेत्यांमधील भेट ही आरक्षणाबाबत नव्हती, याचा खुलासा जरांगे यांनी केलाय. कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आपल्यातील चर्चा साधरण २० मिनिटे चालली असल्याचंही जरांगे म्हणालेत.

दरम्यान साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण ११३ आमदारांचा पराभव करणार असल्याचा इशारा दिला होता. जरांगे पाटील यांचा हा इशारा धनंजय मुंडे, गिरीश महाजन यांना होता. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. आपल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

SCROLL FOR NEXT