Video: "लोकसभा निवडणुकीत पैसा वाटूनही पराभव", रोहित पवारांचा हल्लाबोल!
Rohit Pawar News: मतदार संघावर विविध पक्ष दावे करत असतात मात्र त्यासंबंधीचा निर्णय महाविकास आघाडीचे प्रमुख नेते घेतील. 2024 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व राज ठाकरे यांना भाजपने घोड्यावर बसवलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं मतदान राज ठाकरे खातील व त्याचा फायदा भाजपला होईल अशी भाजपची रणनीती आहे. बच्चू कडू यांनी आपले उमेदवार उभे करून भाजपला मतदान मदत होऊ नये असेच आम्हाला वाटते. बांगलादेशच्या घटनेचा विरोध केवळ महाराष्ट्रातच केला जातो. उत्तर प्रदेशमध्ये का होत नाही का असे आंदोलन गुजरात किंवा उत्तर प्रदेशात का होत नाही इथे केवळ इलेक्शन आहे म्हणूनच मोर्चा काढले जातात. इलेक्शनच्या तोंडावर पवारांना सिक्युरिटी देणे म्हणजे त्यांना कोण भेटते त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी तर दिली जात नाही असा संशय देखील पवारांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीत पैसा वाटूनही पराभव झाला असा टोला रोहित पवारांनी रवी राणांना लगावलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.