Manoj Jarange Patil saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation Row: शिंदे समिती आणि जरांगेंची चर्चा निष्फळ; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला अल्टीमेटम

Manoj Jarange Patil: मराठा नेते मनोज जरंगे यांनी सरकारला अल्टिमेटम देत आंदोलन सोडणार नसल्याचं म्हटलंय. मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करण्याचा जीआर काढण्यात यावा अशी मागणी त्यांनी शिंदे समितीसमोर केलीय.

Bharat Jadhav

आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून अभ्यास केलाय. तर अभ्यास केला असेल तर आता अंमलबजाणी करावी. लगेच जीआर काढावा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीला एक दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. सरकारनं सर्व समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं. लगेच जीआर काढावा, तर मी लगेच आंदोलन सोडेन असंही जरांगे पाटील म्हणालेत.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आरक्षणासंदर्भात सरकारनं एक पाऊल टाकत शिंदे समितीनं आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर जरांगे पाटील यांनी शिंदे समितीला अल्टिमेटम दिला. यासह जरांगे पाटील यांनी आंदोनल मागे घेण्यास नकार दिलाय. यावेळी शिंदे समितीला त्यांनी सणसणीत सवाल केलेत.

सरकारकडे ६ ते ७ दिवस आहेत, जर आरक्षणाबाबत निर्णय झाला नाही तर मुंबईत पुन्हा अजून काही मराठा समाज बांधव येतील. पुढच्य शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाहीत, तेही मुंबईत दाखल होतील, असं जरांगे पाटील म्हणालेत.

अर्धा समाज मागास कसा?

आज न्यायमूर्ती शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समितीच्या कामाची माहिती दिली. किती कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलेत. किती नोंदी मिळून आल्या, याची माहिती देण्यात आली. सर्व समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देता येणार नाही. घरातील एका व्यक्तीला प्रमाणपत्र मिळेल, म्हणजेच जो कोणी अर्ज करेल त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल.

त्यावरून समितीला सुनावताना जरांगे पाटील म्हणाले, मग अर्धा समाजच मागास कसा? समितीने हैदराबाद, सातारा गॅझेटचा विचार करून ओबीसी प्रमाणपत्र द्यावं. सापडलेल्या ५८ लाख नोंदीचा विचार करावा.

मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढा

मराठवाड्यातील सर्व मराठा समाजातील लोकांना कुणबी म्हणा. तसेच मराठा आणि कुणबी एकच आहेत, असा जीआर सरकारने काढावा अशी मागण जरांगेंनी केलीय. दरम्यान बलिदान दिलेल्या कुटुंबियांना १० लाख नोकरी देण्यात यावी. यावर सवाल करताना जरांगे शिंदे समितीवर संतापले. १३ महिन्यांपासून तुम्ही अभ्यास केलाय.

तर अहवाल देऊन टाका. यासाठी कालावधी लागतो. आता वेळ देणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणालेत. मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे, त्या मागणीत कोणतीच तडजोड नसल्याचं जरांगे पाटील म्हणालेत.

काय झाली चर्चा?

सातारा आणि हैदराबाद गॅझेटवर चर्चा

शिंदे समिती अभ्यास झाला असेल तर तो अंमलबाजावणी करावी. सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करत उद्यापासून प्रमाणपत्रे द्यायला सुरूवात करा. मराठावाड्यात ४७ हजार कुणबी नोंदी मिळाल्या. मिळालेल्या नोंदी जरांगेंना माहिती शिंदे समितीकडून देण्यात आलीय. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे त्यांनी अर्ज करून ते घ्याव. सर्व समाजाला सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही, असं शिंदे समितीनं जरांगेंना सांगितलंय. त्यानंतर जरांगेंनी ३५० जाती ओबीसीमध्ये कशा घातल्या असा सवाल जरांगेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahibzada Farhan AK- 47 celebration : मला लोकांची...; AK-47 सेलिब्रेशनवर फरहान काय म्हणाला?

Navratri 2025: नवरात्रीत या वस्तूंची करा खरेदी, घरात कधीच कशाचीही कमी पडणार नाही!

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

Pachora Viral Video: ओ प्रकाश भाऊ, कुदो मत! पण पाटील काही ऐकेना; पूर आलेल्या नदीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची उडी

आम्ही एकत्रच! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र; बॅनर पुण्यात, पण चर्चा महाराष्ट्रात | VIDEO

SCROLL FOR NEXT