nanded  Saam tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये खळबळ; दुचाकीला आग लागल्यानंतर व्यक्तीचा होरपळून मृत्यू

nanded news : नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरात दुचाकीला आग लागल्यानंतर व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड शहराजवळच्या वाजेगाव बंधाऱ्यावर आज सकाळी एक व्यक्ती दुचाकीसह होरपळला. या व्यक्तीचा उपचारापूर्वीच व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जळताना गाडीतून आणि जळत असलेल्या व्यक्तीच्या अंगातून अनेक स्फोट झाले. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले. घटनास्थळी काही साहित्य मिळाले.ते जप्त करुन तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. मयत व्यक्तीची ओळख पटली आहे. तपासाचा भाग म्हणून त्याची ओळख सार्वजनिक करण्यात आली नाही. अधिक तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत. या घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे.

प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक बाजूने तपास सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव म्हणाले. काही लोक जाणीवपूर्वक अफ़वा पसरवत आहेत. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले. फॉरेन्सिक , एटीएस आणि अन्य यंत्रणा मार्फत देखील तपास सुरु आहे. तपासातून जो काही निष्कर्ष निघेल तो समोर येईल, असं सूरज गुरव म्हणाले.

घातापाताचा संशय आहे का? तो जळताना स्फोट कशाचे, तो कोणत्या संघटनेचा आहे का? त्याचा हेतू काय याचा तपास सुरु आहे. सध्या त्या व्यक्तीची प्राथमिक माहिती आहे. त्यावरुन तपास सुरू आहे. घटनास्थळी मिळालेले साहित्य आणि प्रत्यक्षदर्शनीचे जवाब यातून काही निष्कर्ष निघाले आहे. त्या अनुषंगाने तपास असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pranit More : "माझी मोठी चूक, पण..."; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेने मागितली माफी | VIDEO

Police Viral Video: "तू कोण मला विचारणारा?" सीटबेल्ट लावण्याच्या मुद्द्यावरून पोलिसाचा संताप कॅमेरात कैद, व्हिडीओ व्हायरल

Kriti Sanon: कृती सेनॉनने विकले मुंबईतील चार आलिशान फ्लॅट; 8 कोटींपेक्षा जास्त झाला नफा

तीच तीच भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर? मग नक्की ट्राय करा 'या' ५ चटपटीत रेसिपी

Maharashtra News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

SCROLL FOR NEXT