Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत हाजीर हाे ! मालेगाव काेर्टानं बजावलं वाॅरंट

Warrant Against Sanjay Raut : खासदार राऊत हे हजर न राहिल्यास त्यांच्यावर पकड वाॅरंट निघेल असे फिर्यादीच्या वकिलांनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Malegaon News : खासदार संजय राऊत यांच्या विराेधात आज (शनिवार) मालेगाव न्यायालयाने जामीनपात्र वाॅरंट जारी (malegaon court issues bailable warrant against shiv sena mp sanjay raut) केले आहे. राऊत हे आज एका सुनावणीस गैरहजर राहिल्याने न्यायालयाने आदेश बजावला आहे. दरम्यान येत्या दाेन डिसेंबरला खासदार राऊत हे न्यायालयात उपस्थित राहतील असा विश्वास त्यांच्या वकिलांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील गिरणा कारखान्यात 178 कोटींचा अपहार केल्याचा आराेप मंत्री दादा भुसे (dada bhuse) यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या जिल्हा सत्र न्यायालयात संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

आज (शनिवार) त्याची सुनावणी मालेगाव कोर्टात झाली. या सुनावणी दरम्यान खासदार संजय राऊत आजही मालेगाव कोर्टात गैरहजर राहिले. राऊत यांचे वकील एम. वाय. काळे म्हणाले मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी करण्यात आल्यामुळे कोर्टात हजर राहणे शक्य नसल्याचा अर्ज राऊत यांच्यावतीने कोर्टास दिला हाेता. हा अर्ज कोर्टाने नामंजूर केला. खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीनपात्र वाॅरंट बजावले आहे असे वकिलांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मंत्री दादा भुसे यांचे वकील सुधीर अक्कर म्हणाले पुढची सुनावणी 2 डिसेंबरला हाेईल. खासदार राऊत हे हजर न राहिल्यास त्यांच्यावर पकड वाॅरंट निघेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cleaning : 10 मिनिटांत गॅसवरील तेलकट डाग घालवा, वाचा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: सांगलीतील शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग काढून टाकली

Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजू-सलमानची जोडी; साकारणार 'ही' खास भूमिका

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

Shocking News : धक्कदायक! वर्क लोड आला म्हणून नर्सने केली १० रुग्णांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT