आज देशभरात विविध ठिकाणी एनआयने मोठी कारवाई केली आहे.. एनआयने कर्नाटक महाराष्ट्रासह तब्बल ४४ ठिकाणी छापेमारी करत १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. एकीकडे एनआयच्या या कारवाईने खळबळ उडाली असतानाच रेल्वे पोलिसांनीही मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या तरुणांकडून चार बॅग भरुन तब्बल ८२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. (Crime News in Marathi)
रेल्वे प्रवासात अनेकदा छोट्या मोठ्या चोरीच्या घडत असतात. रेल्वे प्रवासावेळी गर्दीचा फायदा घेत हे चोरटे हात साफ घेतात. अनेकदा रेल्वे पोलिसांकडून (Railway Police) चोरीच्या मालासह चोरट्यांना ताब्यातही घेतले जाते. अशीच मोठी कारवाई मध्य रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे.
दिनांक ८ डिसेंबर रोजी चेन्नई निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेसमध्ये (Rajdhani Express) पोलिसांनी ही मोठी कारवाई केली करत दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून चार बॅग भरुन तब्बल ८२ स्मार्ट फोन जप्त करण्यात आलेत. या जप्त केलेल्या मोबाईलची किंमत तब्बल ८ लाख इतकी आहे. या कारवाईचा व्हिडिओही पोलिसांनी शेअर केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल व्हिडिओमधील (Viral Video) तरुण चार बॅगा भरुन ८२ मोबाईल घेऊन राजधानी एक्सप्रेसमधून जात होते. या बॅगा त्यांनी सिटखाली लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांना या तरुणांवर संशय आल्याने नागपूर स्थानकावर (Nagpur Railway Station) पोलिसांनी त्यांची चौकशी केली.
पोलिसांच्या या चौकशीत हा संपूर्ण प्रकार चोरीचा असल्याचे उघड झाले. हे मोबाईल त्यांनी अमला स्टेशनवरुन चोरल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.