Pune Railway News: दिवाळी, छटपुजेमुळे पुणे रेल्वेची 'भरभराट', नोव्हेंबर महिन्यात तिजोरी भरली; किती कोटींचं उत्पन्न?

Pune News: नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, छटपुजेमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्याचा मोठा फायदा पुणे रेल्वे विभागाला झाल्याचे दिसत आहे. पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात तिकीट विक्रीतून एकूण १०० कोटींचे विक्रमी कमाई केली आहे.
Pune News
Pune NewsSaamtv
Published On

सचिन जाधव, पुणे| ता. ९ डिसेंबर २०२३

Pune Railway News:

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, छटपुजेमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्याचा मोठा फायदा पुणे रेल्वे विभागाला झाल्याचे दिसत आहे. पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात तिकीट विक्रीतून एकूण १०० कोटींचे विक्रमी कमाई केली आहे. सणासुदींमुळे पुणे रेल्वेची तिजोरी चांगलीच भरल्याचे दिसत आहे.

पुणे रेल्वे विभागाला यंदाची दिवाळी (Diwali Festival 2023) चांगलीच भरभराट झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात पुणे रेल्वे विभागाने तिकीट विक्रीतून तब्बल १०० कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. तर दंड वसुलीमधून ३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. नोव्हेंबर महिन्यात आलेल्या दिवाळी, छटपूजेच्या सणांमुळे रेल्वेच्या उत्पादनात मोठी वाढ झालीयं.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी व छटपुजा हे दोन मोठे सण होते. या सणांमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. त्याचबरोबर सणासुदीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांनीही रेल्वेला मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. या काळात पुणे रेल्वे प्रशासनाने नागपूर, दानापूर, गोरखपूर या शहरांसाठी विशेष गाड्यादेखील सोडल्या होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune News
Mumabi Fire News: गोरेगावमधील इमारतीला भीषण आग; नागरिकांच्या किंकाळ्या, जीव वाचवण्यासाठी धावपळ

पुणेकरांचं मेट्रो प्रेम संपलंं?

दरम्यान, एकीकडे पुणे रेल्वे प्रशासनाने मोठी कमाई केली असतानाच पुणेकरांनी शहरातील मेट्रोकडे मात्र पाठ फिरवल्याचे दिसत आहे. कारण  पुणे मेट्रोमधून (Pune Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न दोन्हीही घटल्याची आकडेवारी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात १४ लाख पुणेकरांनी प्रवास (Pune Metro) केला आहे. ज्यामधून २ कोटी २० लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. (Latest Marathi News)

Pune News
Pandharpur Vitthal Mandir: विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धनाच्या कामास प्रारंभ, 150 कोटींचा निधी मंजूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com