Eknath Shinde In Gadchiroli: तुम्ही प्राणाची बाजी लावता, म्हणून आम्ही सुरक्षित; मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

Eknath Shinde Celebrate diwali with police personnel in Gadchiroli: 'तुम्ही प्राणाची बाजी लावता, त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं.
Eknath Shinde News:
Eknath Shinde News: Saam tv
Published On

Eknath Shinde News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील अशा पिपरी बुर्गी येथील छावणीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. या सीमाभागात काम करणाऱ्या जवानांना फराळाचे वाटप केले. 'तुम्ही प्राणाची बाजी लावता, त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना फराळाचे वाटप केले. तसेच महिला पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून भाऊबीज सण साजरा केला. 'तुम्ही इथे प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावत आहात. त्यामुळे आम्ही सुरक्षित राहतो. तुमच्या त्यागाची जाण असल्यानेच दिवाळीचा सण तुमच्यासोबत साजरा करण्यासाठी आलो आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Shinde News:
Baramati Dhangar Andolan : सकल धनगर समाजाच्यावतीने उद्या बारामती बंदची हाक

या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनीही हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिदुर्गम भागात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटर करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमात महिला आणि लहान मुलांना कपडे, फराळ आणि भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, राज्य सरकार हे गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याच्यासाठी इथे उद्योगधंदे यावेत यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. याठिकाणी मोठे उद्योग आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, दळणवळण आणि इतर सोयीसुविधा वाढवून इतर जिल्ह्यांइतकाच गडचिरोली जिल्हा देखील विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde News:
Supriya Sule Bhaubij Celebration: ओवाळीते भाऊराया! गटाचा वाद विसरून सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं औक्षण

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, गडचिरोली परिक्षेत्र उपमहानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवसेनेचे विदर्भातील पदाधिकारी किरण पांडव उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com