Baramati Dhangar Andolan : सकल धनगर समाजाच्यावतीने उद्या बारामती बंदची हाक

त्याबाबतचे निवदेन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
dhangar samaj calls baramati bandh tommorrow demanding dhanghar reservation
dhangar samaj calls baramati bandh tommorrow demanding dhanghar reservationSaam tv
Published On

Baramati News :

बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या ( Dhangar Reservation) बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने उद्या (गुरुवार, १६ नोव्हेंबर) बारामती बंदची हाक दिली आहे. त्याबाबतचे निवदेन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. (Maharashtra News)

dhangar samaj calls baramati bandh tommorrow demanding dhanghar reservation
Bhaubeej 2023 : 'स्वाभिमानी'च्या महिला आघाडीची मंत्री हसन मुश्रीफांना खर्डा भाकरीची ओवाळणी

बारामती येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून समाज बांधव बेमुदत उपाेषणास बसले आहेत. खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी आपले पत्र देत माझा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (ncp) तुमच्या मागणीस संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असूनही सरकारच्या वतीने कोणीही अद्याप दखल घेतली गेलेली नाही. दरम्यान महाराष्ट्रातील धनगर बांधवाकडून सरकारचा तसेच बारामतीत दिवाळी निमित्त (diwali 2023) चार दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) दाखल झाले आहेत. तरी देखील त्यांनी भेट तर सोडाच पण साधी उपोषणकर्त्याची चौकशीही केली नाही. यामुळे धनगर बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामतीत सुरू असलेल्या धनगर समाजाच्या बेमुदत उपोषणकर्त्यांपैकी काही आंदाेलकांची आज प्रकृती खालवली. या आंदाेलकांना पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांनी उद्या बारामती बंदची हाक दिली आहे. त्याबाबतचे निवदेन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

dhangar samaj calls baramati bandh tommorrow demanding dhanghar reservation
Bachchu Kadu On Bureaucracy : मंत्रालयाचे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधरेल : बच्चू कडू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com