Shreya Maskar
नोरा फतेहीचे 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे 'केडी - द डेव्हिल' चित्रपटातील आहे. गाण्यात अश्लील शब्द तसेच अश्लील डान्स स्टेप्स पाहायला मिळत आहे. यावर कायदेशीर कारवाई झाली आहे.
प्रसिद्ध गायक बादशाह त्याच्या 'ततेरी' या गाण्यावरून चांगलाच चर्चेत आहे. या गाण्यातील अश्लीलतेमुळे वाद सुरू झाला आहे. यावर बादशाहने माफी देखील मागितली.
1993 मध्ये रिलीझ झालेल्या 'खलनायक' चित्रपटात 'चोली के पीछे क्या है' हे गाणे आहे. अनेकांनी याला 'अश्लील' म्हटले, तरीही हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यात माधुरी दीक्षित झळकली आहे.
1994 मधील 'राजा बाबू' चित्रपटातील 'सरकाई लो खटिया' हे गाणे आहे. हे गाणे गोविंदा आणि करिश्मा यांच्यावर चित्रित करण्यात आले होत
'बीडी जलाइले' हे गाणे 'ओमकारा' (2006) चित्रपटातील आहे. हे गाणे बोल्ड असल्याच्या कारणावरून अनेकांनी आक्षेप घेतला. या गाण्यात बिपाशा बसु झळकली आहे.
कतरिना कैफच्या 'अश्लील' किंवा टोकाच्या अभिनयामुळे 'शीला की जवानी' हे गाणे गाजले. गाणे प्रदर्शित झाल्यावर त्याला मोठ्या विरोधाचाही सामना करावा लागला.
2015मध्ये रिलीज झालेल्या 'गब्बर इज बैक' चित्रपटात 'आओ राजा' हे गाणे आहे. उघड बोल आणि व्हिज्युअल्समुळे हे गाणे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले.
'बेबी डॉल' हे गाणे रागिनी MMS 2 मधील आहे. या गाण्यात सनी लिओनी झळकली आहे. गाण्याचे बोले आणि टोनमुळे वाद निर्माण झाला होता.