Mumbai Crime News: मुंबईत चाललंय तरी काय? वांद्रे रेल्वे स्थानकात तरुणाची निर्घृण हत्या, पोलीस तपास सुरू

Crime News: या प्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कोणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक शोध घेत आहेत.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV

संजय गडदे

Bandra Station:

मागील काही दिवसांपासून मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईच्या वांद्रे टर्मिनस परिसरातून हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विक्रम सिंग (३५ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा असून सध्या खार पूर्व परिसरात राहत होता. या प्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कोणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Beed Crime News: 'पक्षाचं काम थांबव, नाहीतर गोळ्या झाडून दाभोलकर करु; BRS नेत्याला निनावी पत्राद्वारे धमकी, बीडमध्ये खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम सिंगला दारू पिण्याचे व्यसन होते. तो मोल मजुरीचे काम करत होता. जेवण केल्यानंतर रात्री तो वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्मवर जायचा. रविवारी रात्री जेवून झोपण्यासाठी वांद्रे टर्मिनसवर गेला मात्र सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विक्रम सिंग याच्यावर अज्ञात तरुणाने खुनी हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला.

कान, नाकातून रक्तस्त्राव देखील सुरू झाला. डाव्या कानाची पाळी देखील फाटलेली होती आणि शरीरावर साधारणपणे १ x १ इंचाची जखमा देखील आढळून आल्या होत्या म्हणून त्याला उपचारासाठी वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच विक्रम सिंग याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले.

यासंदर्भात मयत विक्रम सिंगसोबत राहणाऱ्या मांगीलाल भुराराम चौधरी यांनी वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम ३०२ भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य पाहून वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळावर अंगुली मुद्रा तज्ञ, श्वान पथक यांना सोबत घेऊन तपासणी करून अहवाल तयार केला असून लोहमार्ग पोलीस सध्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Mumbai Crime News
Gondia Crime News: नकली सोने विकणाऱ्या तरुणाची हत्या; दोघांवर प्राणघातक हल्ला, पाच जणांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com