वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल
धाराशिवमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रकाश आष्टे भाजपमध्ये प्रवेश
भाजपने स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर मविआला दिला मोठा धक्का
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला
BJP Maharashtra, MVA setback : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मविआला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. वसई-विरार आणि धाराशिवमधील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी अन् बहुजन विकास आघाडीची साथ सोडत कमळ घातात घेतले आहे. प्रकाश आष्टे यांच्या रूपाने धाराशिवमध्ये काँग्रेसला जबरी धक्का बसला आहे. तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंचे महत्त्वाच पदाधिकारी भाजपमध्ये सामील झाले आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. धाराशिवचे काँग्रेसचे विश्वासू प्रकाश आष्टे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय वसई- विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. वसईतील भाजप आमदार स्नेहा दुबे पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीसह ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला. बहुजन विकास आघाडीसह उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केले.
वसई विरारमधून कोणकोणत्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला?
निलेश भानुसे, शहर समन्वयक, ठाकरे गट
सुनील मिश्रा - तालुका अधिकारी युवा सेना
प्रकाश देवळेकर - उपतालुकाप्रमुख उबाठा
वैभव म्हात्रे - उप जिल्हाधिकारी, युवा सेना
योगेश भानुसे, उपशहर प्रमुख, उबाठा
संतोष घाग, बहुजन विकास आघाडी
संतोष कनोजिया, बहुजन विकास आघाडी
आनंद पाटील - सामाजिक. कार्यकर्ते
धाराशिवमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का
धाराशिवच्या राजकारण काँग्रेसला जोरदार धक्का मिळाला आहे. ग्रामीण भागातील महत्त्वाचा आधारस्तंभ ढासळलाय.ज्येष्ठ नेते, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश विश्वनाथराव आष्टे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला. प्रकाश आष्टे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात काँग्रेससाठी काम करत पक्ष वाढवलाय. आता हा काँग्रेसला जोरदार धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महत्त्वाचा शिलेदार गेल्याचा फटका काँग्रेसला बसलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.