काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटले; चैन हिसकावली, कपडे फाडले, सकाळी ६ वाजता दिल्ली हादरली

Congress MP Sudha Ramakrishnan robbed : सुधा रामकृष्णन या काँग्रेसच्या खासदार असून त्या तमिळनाडूच्या मयिलादुथुराई मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. ही घटना दिल्लीतील उच्च सुरक्षा असलेल्या चाणक्यपुरी परिसरात पोलिश दूतावासाजवळ सकाळी ६:१५ वाजता घडली.
Congress MP Sudha Ramakrishnan
Congress MP Sudha RamakrishnanSaam TV News Marathi
Published On
Summary

दिल्लीच्या चाणक्यपुरीत महिला खासदार सुधा रामकृष्णन यांच्यावर चेन स्नॅचिंगचा हल्ला.

चोरट्यांनी कपडे फाडल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप.

सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान पोलिश दूतावासाजवळ प्रकार घडला.

दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपासासाठी पथके तैनात.

Congress MP Sudha Ramakrishnan : देशाची राजधानी दिल्लीत खळबळजनक घटना घडली आहे. दिल्लीमध्ये महिला खासदाराला लुटल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये आता नेतेही सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेस खासदार सुधा रामकृष्णन यांची आज सकाळी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात चेन हिसकावली. चोरांनी त्यांना मारलं अन् कपडेही फाडल्याचा आरोप केला जात आहे. सुधा रामकृष्णन या संसदेच्या अधिवेशनासाठी राजधानीमध्ये आल्या आहेत. त्या तमिळनाडू भवनात राहतात. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर महिला खासदारासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.

दिल्ली पोलिसांनी याबाबत तात्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना सुधा रामकृष्णन सोमवारी सकाळी फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी चोर आले आणि त्यांची चेन हिसकावून पळून गेले. सुधा रामकृष्णन यांनी मारहाण झाल्याचाही आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना सकाळी साधारण 6:15 वाजण्याच्या सुमारास घडली. गुन्हेगार विरुद्ध दिशेने येऊन त्यांची सोन्याची चेन हिसकावून पळून गेला.

Congress MP Sudha Ramakrishnan
Vande Bharat Food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळते का? वाचा रेल्वेचे नेमके नियम काय

तमिळनाडूच्या मयिलादुथुराईच्या खासदार रामकृष्णन यांनी सांगितले की, त्या त्यांच्या सहकारी खासदार डीएमकेच्या रजती यांच्यासोबत चाणक्यपुरीतील पोलिश दूतावासाजवळ फिरत होत्या. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, स्कूटरवर आलेल्या एका व्यक्तीने त्यांची चेन हिसकावली. त्या व्यक्तीने हेल्मेटने आपला चेहरा लपवला होता.

Congress MP Sudha Ramakrishnan
Mumbai to Pune : मुंबई-पुणे फक्त ९० मिनिटांत, तिसऱ्या एक्सप्रेस वेचा आराखडा तयार, पाहा नेमका मास्टरप्लॅन

मानेवर जखम, कपडेही फाटले -

सुधा रामकृष्णन यांनी सांगितले की, सकाळी मॉर्निंग वॉकला गेली होती. गुन्हेगार हळूहळू त्यांच्याकडे आला, त्यामुळे त्यांना काही संशय आला नाही. या घटनेत त्यांच्या मानेवर जखम झाली आणि त्यांचा चुडीदार ड्रेसही फाटला.

एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेच्या वेळी परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल झाली का याची चौकशी करत आहेत. तमिळनाडू भवन आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Congress MP Sudha Ramakrishnan
५ ऑगस्टचा मुहूर्त, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? मोदी-शाह अॅक्शनमोडमध्ये, दिल्लीत घडामोडींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com