Political Storm in Maharashtra as BJP Targets Allies Over CJP Leader Meeting 
महाराष्ट्र

अभिजीत दिपकेंच्या भेटीवरून महायुतीत वाद; भाजपकडून संजय शिरसाठ-कडूंवर कारवाईची मागणी

Mahayuti Rift : शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडूंनी CJPच्या अभिजित दिपकेंची भेट घेतली. मात्र याच भेटीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडलीय. नेमकं प्रकरण काय आहे? भाजप मंत्र्यांनी काय मागणी केलीय ?.पाहूयात या रिपोर्टमधून.

Snehil Shivaji

कॉक्रोच जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यातील राजकीय वादाची झळ आता महायुतीतल्या मित्रपक्षांनाही बसू लागलीय. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेऊन संभाजीनगरमध्ये परतलेल्या अभिजित दिपकेंच्या घरी सध्या नेत्यांची वर्दळ पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकत्र असलेल्या शिंदे गटाचे बडे नेतेच आता दिपकेंच्या भेटीला धावत असल्यानं चर्चा तर होणारच.

आधी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि पाठोपाठ आमदार बच्चू कडूंनी दिपकेंची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनं या भेटीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. इतकंच नाही, भाजपच्या वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळेंनी य़ा दोघांवर थेट कारवाईचीच मागणी केलीय.

भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता एकनाथ शिंदे काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतांना शिंदेंनी या राजकीय नाट्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांना समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र यावरून अभिजीत दिपकेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय.

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हा राजकारणातला अलिखित नियम मानला जातो. पण मित्रपक्ष म्हणून भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनीच भाजपच्या कट्टर विरोधकाचे उंबरे झिजवल्याने युतीत मिठाचा खडा पडलाय. याच भेटीसत्रानं शिंदेसेनेनं राज्य भाजपच्या शिरस्त नेतृत्वाला न जुमानता थेट केंद्रीय नेतृत्वाला आपली राजकीय ताकद दाखवून देतायत की या केवळ अनौपचारिक भेटी आहेत? कारण राजकारणात कोणतीच भेट, कोणतीही बैठक विनाकारण होत नसते. त्यामुळे यावरून पुढे काय काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT