Maharashtra Cabinet expansion Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Minister: राज्यातील १६ जिल्ह्यांच्या हाती निराशा; पुणे, जळगाव-नाशिक, साताऱ्याचा राजकारणात दबदबा

Maharashtra Cabinet expansion: महायुती सरकारने आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिलीय. यात भाजपने ९ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ६ तर अजित पवार गटाने राष्ट्रवादीमध्ये ५ नवीन चेहऱ्यांना संधी दिलीय.

Bharat Jadhav

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपच्या १९, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. साधारण ३३ कॅबिनेट ६ राज्यमंत्री झाले. मात्र यात जिल्ह्यानुसार पाहिलं तर सर्वाधिक मंत्रिपदे सातारा जिल्ह्याला मिळाली आहेत. राज्यातील १६ जिल्ह्यांच्या हाती निराशा आलीय.

महायुतीच्या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. भाजपने काही जुन्या चेहऱ्यांना वगळून ९ नवीन चेहऱ्यांना संधी दिली. शिंदे यांच्या शिवसेनेने ६ , राष्ट्रवादीने ५ नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिलीय. राज्यातील जिल्ह्यानुसार मंत्रिपदाची आकडेवारी पाहिली तर १९ जिल्ह्यांमध्ये मंत्रिपदे मिळाली आहेत. परंतु १६ जिल्ह्यांमध्ये एकही मंत्रिपद मिळाली नाहीये. तर पुणे, जळगाव-नाशिकमधून तीन-तीन मंत्री झालेत. तर साताऱ्यास सर्वाधिक चार मंत्रीपदे मिळाली आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, धुळे, सांगली, पालघर, लातूर, वाशिम, सोलापूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालना या जिल्ह्यांना निराशा हाती आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले. यात १३५ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

आज कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांनी शपथ घेतली -

भाजप (१९) - १६ कॅबिनेट, ३ राज्यमंत्री

शिवसेना (११) -०९ कॅबिनेट, २ राज्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस (१) - ०८, १ राज्यमंत्री

६ राज्यमंत्री कोण कोण?

योगेश कदम (शिवसेना)

इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)

मेघना बोर्डीकर (भाजप)

पंकज भोयर (भाजप)

आशिष जैयस्वाल (शिवसेना)

माधुरी मिसाळ (भाजप)

टीम देवेंद्रमध्ये कोण कोण?

कॅबिनेटमंत्री कोणते ?

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

अजित पवार, उपमुख्यमंत्री

चंद्रशेखर बावनुकळे (भाजप)

राधकृष्ण विखे (भाजप)

हसन मुश्रीफ (राष्ट्रादी काँग्रेस)

चंद्रकांत पाटील (भाजप)

गिरीश महाजन (भाजप)

गुलाबराव पाटील (शिवसेना)

गणेश नाईक (भाजप)

दादा भुसे (शिवसेना)

संजय राठोड (शिवसेना)

धनजय मुंडे (राष्ट्रादी काँग्रेस)

मंगलप्रभात लोढा (भाजप)

उदय सामंत (शिवसेना)

जयकुमार रावल (भाजप)

पंकजा मुंडे (भाजप)

अतुल सावे (भाजप)

अशोक उईके(भाजप)

शंभूराजे देसाई (शिवसेना)

आशिष शेलार (भाजप)

दत्ता भरणे (राष्ट्रादी काँग्रेस)

शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)

माणिकराव कोकाटे (राष्ट्रादी काँग्रेस)

जयकुमार गोरे (भाजप)

नरहळी झिरवाळ (राष्ट्रादी काँग्रेस)

संजय सावकरे (भाजप)

संजय शिरसाट (शिवसेना)

प्रताप सरनाईक (शिवसेना)

भरत गोगावले (शिवसेना)

मकरंद पाटील (राष्ट्रादी काँग्रेस)

नितेश राणे (भाजप)

आकाश फुंडकर (भाजप)

बाबासाहेब पाटील (राष्ट्रादी काँग्रेस)

प्रकाश अबिटकर (शिवसेना)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT