Devendra Fadnavis: अडीच वर्षानंतर मंत्र्यांना पुन्हा संधी मिळेल, पण...; मुख्यमंत्र्यांनी ठेवली एक अट

Devendra Fadnavis In Press Conference: अडीच वर्षच मंत्रिपद का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis In Press Conferencesaam tv
Published On

महायुतीचा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय. आज शपथ घेतलेल्या आमदारांना आपल्या मतदारसंघात काम करावं लागणार आहे. योग्य काम करणाऱ्या मंत्र्यांनाच पुन्हा संधी दिली जाणार आहे. महायुती सरकारकडून करण्यात येणाऱ्या ऑडिटमध्ये जे मंत्री नापास ठरतील त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागणार आहे, असा इशारा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षाच्या मंत्रिपदावरील प्रश्नाला उत्तर देताना दिलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर महायुतीची मंत्र्याच्या शपथविधीनंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते.

आज ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र तिन्ही पक्षातील आमदारांना फक्त अडीच वर्ष मंत्रिपद भुषवता येणार आहे. याबाबत त्यांच्याकडून थेट प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती समोर आली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत थेट इशाराही दिलाय.

मंत्र्यांना अडीच वर्षच मंत्रीपद का भुषवता येणार याविषयी त्यांनी माहिती दिली. अडीच वर्षानंतर मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल का? या प्रश्नावरही मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. मंत्र्यांचा कामाचे परफॉम्न्स ऑडिट करू, योग्य काम न केल्यास त्याचा पुनर्विचार केला जाईल. हा निर्णय तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी ठरवलाय. सगळ्या मंत्र्यांचे कामाचे ऑडीट केलं जाणार, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला

विरोधकांनी चर्चा करावी, आम्ही आवाज दाबणार नाही. लोकसभेप्रमाणे करू नये. सभागृहात न बोलता मीडियात बोलायचं अशी लोकशाही चालवणार असतील योग्य नाही. विरोधीपक्षनेते बाबत फडणवीस म्हणाले, या पदाबाबत कायद्याने आणि नियमानुसार विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आणि त्याचा सन्मान करू असंही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल....; देवेंद्र फडणवीस पुन्हा बोलले

परभणी घटनेवर काय म्हणाले मुख्यमंत्री

परभणीच्या घटनेत मनोरुग्णाने अपमान केला त्याला अटक झाली. त्यानंतर उद्रेक झाला. मनोरुग्णाच्या कृत्यावर असंविधानीक पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही. संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे हे सरकार आहे. संविधानाची शपथ घेऊन गौरव घेऊन काम करू. असंही फडणवीस म्हणाले.

अडीच वर्ष मंत्रिपदाबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे

हे तीन्ही पक्षातील नेत्यांना संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतलाय. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलाय. अनेकांची क्षमता असते, इच्छा असते, म्हणून पक्षाने निर्णय घेतला की, जो काम करेल तो पुढे जाईल.

Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet Expansion : टीम देवेंद्र फायनल! कुणाला कॅबिनेट, कुणाला राज्यमंत्री, ३९ मंत्र्यांची यादी एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com