Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल....; देवेंद्र फडणवीस पुन्हा बोलले

Devendra Fadnavis Latest News : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पुण्यात एका महोत्सवाला हजेरी लावली. या कार्यक्रमात फडणवीस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल असे सांगितले.
 Devendra Fadnavis News
devendra fadnavissaam
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा पुण्याला पोहोचले. पुण्यात मुख्यमंत्र्यांनी पुस्तक महोत्सवाला भेट दिली. या कार्यक्रमाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोंडभरून स्तुती केली. 'प्रमोद महाजन म्हणायचे एका कार्यक्रमात दोनदा जाऊ नये, पण इथे मी सारखा येतोय. कारण हा कार्यक्रम इतका चांगला आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुण्यात पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. यावेळी फडणवीस म्हणाले, 'मला पुस्तक महोत्सवात बोलवता. मात्र शेजारी असलेल्या खाद्य महोत्सवात नेत नाहीत. खाद्य महोत्सवाचा मांडवही दाखवत नाही. पुढच्या वेळी हा अन्याय दूर करा'.

 Devendra Fadnavis News
Pune Court: लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला म्हणणे योग्य नाही; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'पुणे आपली सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठीचा कार्यक्रम होत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी मला बोलावले. याचा मला आनंद आहे. पुण्याच्या विकासाचा अजेंडा मागील अडीच वर्षात सेट केलेला आहे. आम्ही आता त्याला गती देऊ'.

 Devendra Fadnavis News
Pune News : धक्कादायक! सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ, खळबळजनक माहिती आली समोर | VIDEO

दादर हनुमान मंदिर प्रकरणावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 'न्यायालयाने मागे निर्णय देऊन मंदिरांची कॅटेगिरी तयार केलेली आहे. जुनी मंदिर या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात. रेल्वे प्रशासनाबरोबर या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे. आम्ही चर्चेतून मार्ग काढू आणि कॅटेगरी प्रमाणे नियमितीकरण करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराबात लवकरच कळेल, असेही स्पष्ट केले.

 Devendra Fadnavis News
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा मुक्काम अजूनही 'वर्षा'वर, मुख्यमंत्री फडणवीस 'सागर'वर

'भारतीय सभ्यता एक अशी सभ्यता आहे की, जी कधी संपली नाही. ती सातत्याने सुरु राहिली. तंत्रज्ञानाने ज्ञानाची दालनं वाढवली आहेत. इतर भाषेतील पुस्तकं वाचण्यासाठी आता ती अनुवादित होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तंत्रज्ञानाने ते लगेच आपल्या भाषेत वाचता येते, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com