Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा मुक्काम अजूनही 'वर्षा'वर, मुख्यमंत्री फडणवीस 'सागर'वर

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या वर्षा निवसस्थानावर मुक्कामी आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंदल्यावरून राज्याचा कारभार चालवत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर बंगल्याचे वाटप होईल.
MLA Disqualification Result Update
MLA Disqualification Result UpdateSaam Digital
Published On

CM House varsha bungalow : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेकडून पसंती देण्यात आली. ना भुतो न भविष्य असं यश २०२४ विधानसभा निवडणुकीत आले. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवार यांना ४१ जागांवर यश मिळाले. महायुतीनं यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. आठवड्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सागर बंगल्यावरच आहे. तर एकनाथ शिंदे वर्षा निवसस्थानी आहेत. (Shiv Sena president and Deputy Chief Eknath Shinde devendra fadnavis cm house varsha bungalow cabinet minister bungalow mumbai news)

देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर -

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे वर्षा बंगलाच असतो. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. पण देवेंद्र फडणवीस सध्या सागर बंगल्यावर राहत आहेत. मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगला मिळाला होता. आता या सरकारमध्ये अद्याप खातेवाटप पूर्ण झालेले नाही. खातेवाटप झाल्यानंतर बंगल्याचे वाटप केले जाईल. त्यानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा निवस्थानावर जातील, असे सांगितले जातेय.

MLA Disqualification Result Update
Maharashtra Politics : सावंत-केसरकरांची भेट शिंदेंनी नाकारली, मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे धाव

एकनाथ शिंदेंचा मुक्काम वर्षा बंगल्यावरच -

ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तेव्हापासून एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर मुक्कामी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांत एकनाथ शिदे वर्षा निवास स्थान सोडणार आहेत. एकनाथ शिदे यांचे बंगल्यावरील सर्व सामान शिफ्ट करण्यात आलेय. फक्त सरकारी कामांमुळे अद्याप ते वर्षावर असल्याचे समजतेय. पुढील दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदे वर्षा निवसस्थान सोडतील.

देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात कधी शिफ्ट होणार?

२०१४ ते २०१९ या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी वर्षा बंगल्यावरून त्यांनी महाराष्ट्राचा गाडा हाकला होता. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरून महाराष्ट्रातील सूत्रे हाताळणार आहेत. देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनानंतरच वर्षा बंगल्यावर येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसात वर्षा बंगला सोडणार आहेत. त्यानंतर वर्षा निवासस्थानातील छोटी-मोठी कामे पूर्ण केली जातील. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर येतील, असे सूत्रांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com