Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: थंडी गायब पाऊस सुरू! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता, बळीराजा चिंतेत

IMD Alert: आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Priya More

राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील गारठा कमी झाला आहे. धुके आणि ढगाळ वातवरणामुळे किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात पावासासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. किमान तापमान वाढले आहे. येत्या २४ तासांत थंडीचा जोर कमी होणार असून किमान तापमान ३ ते ६ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात येत्या दोन दिवसांत पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला जपण्याचा सल्ला प्रादेशिक हवामान विभागने दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.

त्याचसोबत अग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. पश्चिम चक्रावातांच्या तीव्रतेमुळे राज्यातील थंडी गायब झाली असून उत्तरेकडील राज्यात दाट धुक्यांची चादर पसरली आहे. याचा प्रभाव राज्यात देखील पाहायला मिळत आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे थंडी कमी झाली आहे. राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celina Jaitly Post: युएईमध्ये कैद भावाच्या आठवणीत रडली अभिनेत्री; म्हणाली, 'एकही रात्र तुझ्यासाठी रडल्याशिवाय...

Gold Rate Today: सोन्याच्या दराने उच्चांक गाठला! १० तोळ्यामागे १२००० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Maharashtra Live News Update : खंडाळा बोगद्याजवळ ट्रकला आग; पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

जबरदस्ती शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात; इरफाननं ओळख लपवून तरूणींना फसवलं

Bigg Boss 19: प्रणित मोरेने अभिषेक बजाजच्या स्वप्नाचा केला चक्काचूर; सांगितलं अशनूर कौरला का केलं सेफ

SCROLL FOR NEXT