
पुणे शहरात पावसाला सुरुवात पुणे-सातारा रोडवर पाऊस सुरू झाल्याने पुणेकरांची धावपळ.
दुपारनंतर शहर आणि परिसरात उष्ण वातावरण जाणवत होतं.
आठ वाजता पावसाला सुरुवात, अनेक ठिकाणी तुरळक पाऊस.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल.
धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अंतरवाली सराटीत चर्चा सुरू.
वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होऊन आज वाल्मीक कराड याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व.
बीड न्यायालयाने वाल्मीक कराडला ७ दिवसांची एसआयपी कोठडी सुनावली. कोर्टाच्या निकालानंतर कराड समर्थकांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. आता वाल्मीक कराडची पत्नी मंजिरी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. 'लोकांच्या चुकीच्या मागणीमुळे माझ्या नवऱ्याला अडकवलं. न्यायव्यवस्था कोणाच्या तरी दबाखाली आहे. मात्र आम्ही न्यायव्यवस्थेने चालू. न्याय मागण्यासाठी आंदोलन चालूच राहणार' असे त्यांनी म्हटले आहे.
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे रस्त्यावर टायर पेटवले.
वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ कन्हेरवाडी गावाबाहेर परळी-अंबाजोगाई रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहे.
कराड समर्थकांकडून टायर पेटवून घोषणाबाजी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 च्या तयारीसाठी पदाधिकारी बैठक मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील एम आय जी क्लब येथे पार पडत आहे.
बैठकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि माजी आमदार झीशान सिद्दिकी हे मार्गदर्शन करणार आहेत.
उत्तर मुंबई जिल्ह्यातील अनेक वॉर्डवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून दावा करण्यात येत आहे.
धनंजय देशमुख मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची धनंजय देशमुख यांची माहिती हाती आली आहे.
पुणे शहरातील बावधन येथे असणाऱ्या एका इमारतीच्या बाहेर ४ ते ५ तरुण उभे होते. १५ जानेवारी पहाटे २:४५ वाजता, त्यातील दोन जणं तिथून गेल्यानंतर उर्वरित जणांपैकी एकाने तिथे असलेल्या एका वाहनावर शस्त्राने काचा फोडल्या तसेच तिथं पडलेल्या एका दगडाने गाडीचे नुकसान केलं.
बीड पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या ५ जणांना घेतलं ताब्यात
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कराड समर्थकांचा यामध्ये समावेश
तर या सर्व प्रकरानंतर बीड शहरात काहीसं तणावाचे वातावरण
पांगरी गावात कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडला कोर्टाने ७ दिवसांची SIT कोठडी सुनावली आहे.
पांगरी गावात वाल्मीक कराड समर्थ आक्रमक....
वाल्मीक कराडच्या समर्थकांकडून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न...
सकाळपासून पांगरी गावातील वाल्मीक कराड समर्थक परळी बीड महामार्गावर ठिय्या मांडून...
नांदेडमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थाला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली.
हॉस्टेलमधील रूममध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण केली.
नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेल मधील ही घटना आहे.
नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत क्षुल्लक कारणावरून एकाची चाकू आणि दगडाने ठेचून हत्या केली.
या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
करण नैनिकर अस मृतकाचे नाव आहे.
तर यातील मुख्य आरोपी कुणाल राऊत आहे.
मुंबई अंधेरी पूर्वेत झोपड्यांवर तोडक कारवाई
एस आर ए योजना राबवण्यासाठी तोडक कारवाई
अंधेरी पूर्वेकडील कदमवाडी येथील झोपडपट्टीवर तोडक कारवाई
तोडक कारवाईला झोपडीधारकांचा विरोध
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात
विरोध करणाऱ्या झोपडीधारकांना पोलिसांनी बाजूला करत झोपडयांवर चालवला बुलडोझर
बीड जिल्हा न्यायालयात २.४५ वाजता होणार सुनावणीला सुरुवात
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या न्यायालयासमोर होणार सुनावणी
सरकार पक्षाच्यावतीने एडवोकेट बाळासाहेब कोल्हे, एडवोकेट अजय राख मांडू शकतात बाजू
आरोपीच्या बाजूने एडवोकेट सिद्धेश्वर ठोंबरे व ऍडव्होकेट संघनी मांडू शकतात बाजू
शरद पवार व अजित पवार उद्या एकाच मंचावर
बारामती कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर
तब्बल दहा महिन्यानंतर काका पुतणे एका मंचावर
राजकीय वर्तुळात चर्चा
धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी केजमध्ये दाखल झाले आहेत. केज येथील शासकीय विश्रामगृहात सीआयडी अधिकारी व धनंजय देशमुख यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. चर्चेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तसेच त्यांच्या ताब्यातून 8 दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले असून, दुचाकी वाहन चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. रफिक उमर जमादार वय 37 वर्ष आणि निलेश मनोहर गायकवाड वय 30 वर्ष अशी दुचाकी वाहन चोरणाऱ्या रेकॉर्डवरील अटल चोरट्यांची नावे आहेत. रफिक उमर जमादार आणि निलेश मनोहर गायकवाड यांच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी वाहनांची किंमत जवळपास 6 लाख 55 हजार रूपये इतकी आहे.
शहरातील उच्चभ्रू सोसायटी मध्ये वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे कोट्यवधी रुपयांचा 4 BHK फ्लॅट
आता उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या पार्क आयव्हरी इमारतच्या 6 व्या मजल्यावर 601 नंबर चा 3.15 करोड पेक्षा अधिक किमतीचा 4 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर-खाकुर्डी गावात कांद्याच्या शेतात गांज्याची लागवड केली असल्याची गुप्त माहिती वडनेर-खाकुर्डी पोलिसांना मिळताच त्यांनी शेतात छापा टाकत गांजाची शेती उध्वस्त करत सुमारे 2 लाख 29 हजाराचा 36 किलो ओला गांजा जप्त केला आहे.
परळी तालुक्यातील शिरसाळा, धर्मापुरी गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिलीय. वाल्मीक कराड याच्या समर्थनार्थ धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आले असून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आहे.
मागील 14 दिवसात विदर्भात ६ वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय... भंडारा जिल्ह्यात २ तर नागपुर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी १ वाघाचा मृत्यू... विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह अन्य व्याघ्र प्रकल्प मध्ये वाघांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील काही दिवसात याच वाघांचा मृत्यूच प्रमाण लक्षवेधी ठरल आहे..
केज पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड नेण्यात आले आहे
त्यानंतर कराडची वैद्यकीय तपासणी करण्याची शक्यता आहे
आणि त्यानंतर न्यायालयात हजर केले जाऊ शकते
संतोष देशमुख प्रकरणी Kidnapping करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती? त्यांना नंतर घरं कोणी राहायला दिली?
या सगळ्या गोष्टी तपासात येईल
खंडणी मधील जे आरोपी होते ते कोणाच्या घरात, कोणी गाड्या पुरवल्या हे सगळं समोर येईल
परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केज मध्ये गुंडांची प्रवृत्ती झालीय
वाल्मीक कराड याच्या पांगरी गावात युवकाच मोबाईलच्या टावर वर चढून शोले स्टाईल आंदोलन...
वाल्मीक कराड याच्यावरील गुन्हे मागे घेण्याची युवकाची मागणी..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते INS सुरत, वाघशीर, निलगिरीचं लोकार्पण
दरोडेखोरांनी लांबविले हनुमानाचे दागिने .
पुजाऱ्याला बांधून दरोडेखोरांनी हनुमान मूर्तीवरील आभूषणे लुटली.
जवळपास साडे पाच किलो चांदीचे दागिने व दान पेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोरांचा पोबारा.
सोनाळा पोलिस घटनास्थळी दाखल.
सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन जागृत अस हनुमानाचे मंदिर असून अनेक राज्यातून भाविक याठिकाणी येत असतात.
न्यायालयात येणाऱ्या वकिलांच्या गाड्यांची पार्किंग देखील केली बाहेर
केज न्यायालय परिसरात कोणतीही गाडी आत मध्ये आणण्यास बंदी
कोपरगाव येथील बेट परीसरात शेतकऱ्यांनी नदीत लावलेल्या अनेक मोटरमधील तांब्याच्या तारा चोरी झाल्या आहेत.. मध्यरात्री लाईट नसताना चोरट्यांनी केलेल्या चोरीत अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे..
विद्यार्थ्यांनी शाळेला प्रस्ताव देण्यासाठी २४ जानेवारीपर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
सकाळी जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक घेणार त्यानंतर पुणे पालिकेत आयुक्तासोबत बैठक
दुपारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण अधिकाऱ्यांशी करणार चर्चा
बारामती मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात करणार चर्चा
काही वेळात सुप्रिया सुळे पालिकेत येणार
वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे.
वाल्मीक कराड वर हत्येचे गंभीर गुन्हे असताना त्याला सरकारी सुरक्षारक्षक कोणी पुरवला?
अंजली दमानिया यांचा गृहमंत्र्यांना एक्स पोस्ट करून सवाल
सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातून अशा गुंडांना सुरक्षा पुरवणार का?
वाल्मीक कराड वर गंभीर गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसा केला?
म्हणजे मुंडे यांच्या आशीर्वादाने ना?
परळी येथे वाल्मीक कराड याच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनाबाबत देशमुख कुटुंबिय किंवा आमचे गावकरी काही बोलणार नाहीत
एसआयटी व सिआयडी च्या अधिकाऱ्यांची भेट झाली यात तपास योग्य दिशेने सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली, असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
उजनी धरणातून यांत्रिक बोटीद्वारे केल्या जाणाऱ्या अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे
माढा तालुक्यातील शिराळ येथील उजनी धरणातून वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले आहेत. ही कारवाई माढ्याचे तहसीलदार विनोद ननवरे व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केली आहे.
आज परळी बंदची हाक वाल्मीक कराड याच्या समर्थकांनी दिली आहे... काल वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर परळी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं... समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी देखील केली होती.. दरम्यान आज परळी बंदची हाक दिली आहे
भोर शहरातील पोलिस ठाण्यासमोरील श्रीपतीनगरमधील बंद असलेली चार घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागीने व १० लाख १० हजारांच्या रोख रक्कमेसह २६ लाख ३५ हजार रुपयांचा चोरट्यांनी चोरून नेला. पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या. चोरी झालेल्या दोन घरातील व्यक्ती सोमवारी (ता.१३) दुपारी व सायंकाळी घरी आल्याने दोन चो-या उघडकीस आल्या. परंतु दोन घरातील व्यक्ती मंगळवारी (ता.१४) सकाळी घरी आल्यानंतर चोरी उघडकीस आली. श्रीपतीनगरमधील भारती दिपक मोरे आणि सविता विलास जेधे यांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. भारती मोरे यांच्या घरातील ६ लाखांची आणि सविता जेधे यांच्या घरातील ६० हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली.
- सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहात 'होम प्रदीपन विधी' झाला संपन्न..
- लाखो भक्तांच्या साक्षीने पार पडला 'होम प्रदिपण विधी'
- एकदा भक्तलिंग बोला हर्रर्रर्रर्रचा जयघोष करत होम मैदानावर मानकरी आणि सेवेकऱ्यांनी केली तुंबळ गर्दी
- यावेळी मानाच्या सात हि नंदीध्वजांना करण्यात आली होती आकर्षक विद्युत रोषणाई,पहिल्या नंदीध्वजाला नागफणीचा चढवण्यात आला होता साज..
- होम मैदानावरील अग्नि कुंडात कुंभार कन्येला प्रतिकात्मक स्वरूपात देऊन पार पाडण्यात आला 'होम प्रदिपण विधी'
- शुभ्रधवल बाराबंदी परिधान केलेल्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला होम विधी..
- अग्नीकुंडाभोवती होम विधी झाल्यानंतर मानाच्या सात नंदीध्वजांनी घातली प्रदक्षिणा
लक्झरी बसची ट्रकला धडक..
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पासून काही अंतरावर अपघात..
या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती..
15 जण जखमी, प्राथमिक उपचारासाठी धामणगाव रुग्णालयात दाखल.
भारतातील तिसरं आणि राज्यातील पहिल्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराची उभारणी नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आली असून या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. श्री श्री राधा मदन मोहनजी यांचे हे भव्य मंदिर असून 9 एकर जागेत याची उभारणी करण्यात आलेय. 15 वर्षांपासून या भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात येत होते. संपूर्णतः संगमरवरी दगडाने या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून मंदिरासह भव्य म्युजियम, प्रशस्त हॉल आणि विश्रामासाठी खोल्यांची व्यवस्था या मंदिरात करण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून देशविदेशातील भक्तगणं खारघर मध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली.
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत पर्यावरण खात्याकडे पुन्हा परवानगी मागण्यात आली आहे. यावरुन शक्तीपीठ महामार्ग होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यामुळे आता बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कंत्राटदार जोपासण्यासाठी हा उद्योग करण्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना मारक असणारा निर्णय होणार असेल, तर सरकारला धडा शिकवल्या शेतकरी स्वस्थ बसणार नाही,असा इशारा महामार्ग संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
जालन्यातील अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील एका युवा शेतकऱ्यांने उसाच्या पहिल्या खेपेची चक्क डीजे लावून मिरवणूक काढलीय.जालन्यातल्या मठपिंपळगाव येथील युवा शेतकरी धीरज जिगे यांनी जवळपास चार एकर उसाची लागवड केली आहे आणि आता तो ऊस काढणीला आल्यानंतर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची जिगे यांनी चक्क गावाच शिवार संपेपर्यंत डीजे लावून मिरवणूक काढली. सध्या या युवा शेतकऱ्यांना काढलेल्या मिरवणुकीची परिसरामध्ये जोरदार चर्चा आहे....
जळगाव तीळगुळाचे वाटप करीत सर्वत्र गोडवा पसरविणाऱ्या मकर संक्रातीच्या सणाला पतंग आणि मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या घटना शहरात घडल्या. रामेश्वर कॉलनीतील सात वर्षीय बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून बेशुद्ध होऊन त्याला गंभीर दुखापत होण्यासह आठ वर्षीय बालक पतंग पकडण्यासाठी पळत असताना खाली पडल्याने चेहऱ्याला मार लागला. या शिवाय दुचाकीवर जाणाऱ्या महिलेसह दोन जणांच्या गळ्याला व हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली.
जळगाव तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे रात्री पारा १३ अंशावर स्थिर आहे. तर दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. हिवाळ्यात ३० अंशाच्या असलेला दिवसाचा पारा २५ अंशापर्यंत खाली आला त्यामुळे दिवसादेखील वातावरणात आल्हाददायक गारवा जाणवत होता.
तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या आठवडाभरापासून वाऱ्यांचा वेग वाढला आहे. १० किमी वेगाने असलेले वारे वेगाने वाहत आहेत. त्यामुळे जरी रात्रीचे तापमान वाढले असले तरी थंडीचा कडाका अधिक आहे.वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारेही काही प्रमाणात सक्रीय आहे. त्यामुळे तापमान वाढले असतानाही गारठा अधिक जाणवत आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५३ हजार हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, तूर, आणि कपाशीची या खरीप पिकांचे मोठे झाले नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने ६५ हजार शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींपेक्षा जास्त निधीची मागणी केली होती. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मदतीची प्रक्रिया रखडली. निवडणुकीनंतर तीन महिने झाले तरी मदतीचा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना सांगलीमध्ये कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शांतीनिकेतन लोक विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मानाचा कर्मयोगी पुरस्कार यंदा पाटोद्याचे आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना जाहीर झाला होता. आणि हा पुरस्कार प्रदान सोहळा हा संपन्न झाला आहे.. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे आणि ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याहस्ते व शांतिनिकेतन विद्यापीठाचे संचालक गौतम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्मृतिचिन्ह देऊन भास्करराव पेरे पाटील यांचा गौरव करण्यात आला. तर तासगावचे आमदार रोहित पाटील देखील उपस्थित होते.
- चुंचाळे पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा राहणार बंद
- दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद
- तर शनिवारी देखील होणार कमी दाबाने पाणीपुरवठा
- सातपूरसह सिडकोतील काही भागात देखील पाणीपुरवठा राहणार बंद
- नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन
- मकर संक्रांतीला नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांच्या कारवाईची संक्रांत
- पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी काल एका दिवसात १३ गुन्हे दाखल
- घातक नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी ४ पालकांसह ११ जणांना अटक, न्यायालयानं सुनावली ३ पोलीस कोठडी
- नायलॉन मांजामुळे तरुणाचा बळी गेल्यानंतर पोलिसांकडून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांची धरपकड
- इमारतींचे टेरेस, छोट्या गल्ली आणि मैदानावर अचानक छापे टाकून पोलिसांची कारवाई
- तर काल संक्रांतीला पोलिसांनी जप्त केले १ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे १३३ नायलॉन मांजाचे गट्टू
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगरच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे असणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटी घोटाळ्यातील पोलिस कोठडीत असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी झाली आहे. 21 डिसेंबर रोजी संकुलातील घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कंत्राटी लिपीक हर्षकुमारने कुटुंबातील सदस्य, मैत्रीण, सहकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केला. आर्थिक गुन्हे शाखेने यात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली. त्यात हर्षकुमारची तब्बल 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत कसून चौकशी झाली. मंगळवारी या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यामुळे यात आता अन्य आरोपी वाढण्याची शक्यतादेखील धूसर झाली आहे. तर हर्षकुमारचा एक मित्र अद्यापही पसार आहे. गुन्ह्यात मोबाइल, टॅबसह ई-मेलआयडी बदलल्याची मुख्य भूमिका राहिल्याने आयटी अँक्टची वाढ करण्यात आली.
- संक्रांतीच्या दिवशी पतंग उत्सवात वेगवेगळ्या ठिकाणी सतरा नागरिकांना मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करावे लागले. उत्साहात दोघांचा मृत्यू
- एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावत असताना हृदयविकाराचा धक्क्याने मृत झाला
- रितेश गंधश्रीवार असे या तरुणाचे नाव असून कापलेली पतंग पकडण्यासाठी तो धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागले असताना औषध घेत असताना अचानक बेशुद्ध पडला त्याला मेडिकलमध्ये दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले
- सोहेल खान हा सहकाऱ्यांसह गिट्टीखदान परिसरात पाचव्या मजल्यावर पतंग उडवीत होता, स्लॅबवर सुरक्षा भिंत नव्हती, पतंग उडविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला त्याला जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले
- मेडिकलमध्ये दहा तर मेयो रुग्णालयात सात अशा एकूण 17 नागरिकांना नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले
- जखमींमध्ये काही रुग्ण पतंगीचा पाठलाग करून जखमी झाले तर काहींच्या बोट, नाक, कान, चेहऱ्याला इजा झाली
- तीन मुलांचे नायलॉन मांजामुळे बोट कापले गेले
- येत्या शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक
- एकीकडे प्रयागराजचा कुंभमेळा पार पडत असताना नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री घेणार आढावा
- बैठकीला मुख्य सचिवांसह कुंभमेळ्याशी निगडित २३ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना निमंत्रण
- मात्र नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्र्यांसह महायुतीच्या एकाही आमदाराला बैठकीचं निमंत्रण नाही, सूत्रांची माहिती
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीपासून जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि महायुतीच्या आमदारांना दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय
- २०२६-२७ मध्ये पार पडणार नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा
- सातपूर परिसरातून दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- 3 लाख 87 हजार रुपयांचे ड्रग पोलिसांनी केलं जप्त
- मागच्या दोन दिवसांपूर्वी देखील काही महिलांसह ड्रग्स विक्री करणाऱ्या लोकांना पोलिसांनी घेतले होते ताब्यात
- सातपूर परिसरात ड्रग्स विक्री सुरू असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती, याच माहितीनुसार पोलिसांनी केली कारवाई
- ताब्यात घेतलेले दोघेही संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची पोलिसांची माहिती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.