Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यावर 'अवकाळी' संकट! वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

IMD Alert For Maharashtra: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अककाळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Priya More

राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तापमान वाढले आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज देखील अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याठिकाणी अवकाळी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, अहमदनगर, सातारा, पुणे, संभाजीनगर, जळगाव आणि जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमानात मोठी वाढ होईल.

मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहिल आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. पुण्यात देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक वायाला गेले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतपिकांची काळजी घ्यावी आणि काढलेले पिक सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT