Maharashtra Weather : परभणीत उन्हाचा कहर; बीड, मालेगावात अवकाळी पाऊस; राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण

Beed Malegaon Unseasonal Rain : राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशावर पोहचले आहे. यामुळे उष्णता देखील वाढली आहे. दरम्यान येत्या चार- पाच दिवसात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSaam tv
Published On

Maharashtra Weather : मागील आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशावर पोहचले आहे. यामुळे उष्णता देखील वाढली आहे. दरम्यान येत्या चार- पाच दिवसात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मालेगाव परिसरात अवकाळी पाऊस झाला आहे. तर बीडच्या पाटोदा तालुक्यातील परिसरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. मात्र परभणी व नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर कायम आहे.

परभणीत पारा ४० अंशाच्या वर 

परभणी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. आज तापमानाने चाळीस अंशांचा आकडा पार केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून परभणीतील तापमान सातत्याने वाढत आहे. आज त्याची तीव्रता अधिक जाणवली जात आहे. आज दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक घरांमध्येच थांबणे पसंत करत आहेत. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Weather
Turmeric Price : हळदीला मिळाला आतापर्यंतचा सर्वाधिक दर; पाडव्याच्या मुहूर्तावर १४ हजार ९११ प्रति क्विंटल भाव

मालेगाव शहरासह ग्रामीण भागांत अवकाळी पावसाची हजेरी
वाशीम
: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरासह ग्रामीण भागांत अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे उन्हाचा चटका वाढला होता. मात्र आज अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather
Sangli Jail : धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांकडे गांजा; तिघा कैद्यांवर पोलीसात गुन्हा

नंदुरबार जिल्ह्यात तापमानात वाढ
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर आज जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. यामुळे दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता अधिक प्रमाणात वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण 

राज्यात सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असेल्या जळगाव जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. तीन दिवसांपूर्वी तापमान ३९ अंशावर पोहचले होते. दरम्यान खानदेशात येत्या चार- पाच दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com