Heavy Rainfall Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Maharashtra Rain News Weather Update: आजही हवामान विभागाने काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Weather Update: राज्यात हवामानामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असतानाच काही भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच आजही हवामान विभागाने काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान विभागाने आज राजधानी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे तसेच कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या व मध्यम पावसाचा अलर्ट दिला आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. खानदेशातील तिनही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या भागात उद्या वादळी वाऱ्यासह जोरधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्याही (शनिवार, १९, सप्टेंबर) राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT