Assam Train Accident : आठवडाभरातच दुसरा मोठा रेल्वे अपघात, आसाम-अगरताळा- एलटीटी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

Train Accident News: आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात झाला असून ८ ते १० डबे रुळावरून घसरले आहेत.
आठवडाभरातच दुसरा मोठा रेल्वे अपघात, आसाम-अगरताळा- एलटीटी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले
Assam Train AccidentSaam Tv
Published On

आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे आगरतळा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे ८ ते १० डबे रुळावरून घसरले. गुरुवारी दुपारी ३.५५ वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ट्रेनचे ८-१० डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे प्रवक्त्याने दिली आहे.

आगरतळा ते मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी ट्रेन डिबालोंग स्थानकावरून जात असताना रुळावरून घसरली. रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलं नाही. या अपघाताचा परिणाम इतर रेल्वे सेवेवर होऊ नये म्हणून रुळावरून डबे हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

आठवडाभरातच दुसरा मोठा रेल्वे अपघात, आसाम-अगरताळा- एलटीटी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले
Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

अपघातानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. याशिवाय अधिक माहिती किंवा मदत मिळवण्यासाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. ०३६७४ २६३१२० आणि ०३६७४ २६३१२६ या क्रमांकावर संपर्क साधून कोणतीही व्यक्ती अपघाताशी संबंधित माहिती किंवा मदत मिळवू शकते.

अपघाताची माहिती मिळताच आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ''आज १५:५५ वाजता डिबालोंग स्टेशनवर आगरतळा-एलटीटी एक्स्प्रेस क्रमांक १२५२० ट्रेनचे ८ डबे रुळावरून घसरले. प्रवाशांचे मोठे नुकसान झाले नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असून लवकरच मदत घटनास्थळी पोहोचेल.''

आठवडाभरातच दुसरा मोठा रेल्वे अपघात, आसाम-अगरताळा- एलटीटी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले
Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

तामिळनाडूमध्ये दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

दरम्यान, शुक्रवारी तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर ही मोठा अपघात घडला होता. येथे दरभंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीला धडक झाली होती. मालगाडीला धडक झाल्यानंतर दरभंगा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून खाली घसरले होते. यात अनेक एसी कोचदेखील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com