Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

Train Accident : तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेस ट्रेनची मालगाडीला धडक झालीय.
Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस  मालगाडीला धडकली
Darbhanga Express AcccidentTv9
Published On

तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडीला धडक झालीय. मालगाडीला धडकल्यानंतर दरभंगा एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. यासोबतच एका डब्यात आल्याचीही बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीला धडक झाल्यानंतर दरभंगा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून खाली घसरलेत. यात अनेक एसी कोचदेखील आहेत. या अपघातात इंजिनसुद्धा डिरेल झालंय.

अपघातानंतर मालगाडीला आग लागल्याची माहिती हाती आली आहे. धडक झालेली मालगाडी लूप लाइनमध्ये उभी होती. तर दरभंगा एक्स्प्रेसही त्याच रुळावरून धावत होती. दरम्यान अपघात तेव्हा झाला जेव्हा दरभंगा एक्स्प्रेसचा रेल्वेचा गती ७५ किलोमीटर प्रतितास होती. ही रेल्वे म्हैसूरहून दरभंगाला जात होती.

Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस  मालगाडीला धडकली
Viral Video: शानदार, जबरदस्त! मेट्रोमध्ये दुर्गा मातेची स्थापना? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

अपघात झाल्यानंतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सूर करण्यात आले आहे. या रेल्वे अपघातात अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर पुन्हा एकदा रेल्वे यंत्रणेवर प्रश्न निर्माण होत आहे की, जेव्हा मालगाडी एका रुळावर होती त्याच रुळावर एक्स्प्रेस रेल्वे आली कशी? असा प्रश्न केला जात आहे. लाइनमॅनकडून काही चुकी झाली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन दिवसांपूर्वी,गुरुवारी यूपीच्या बिजनौरमध्ये ट्रेन उलटवण्याचा मोठा कट उघडकीस आला होता.जिथे रेल्वे रुळावर दगड पडलेले आढळले होते.ज्या रुळावर दगड सापडले त्याच ट्रॅकवर मेमो एक्सप्रेस ट्रेन आली.चालकाला काही समजण्यापूर्वीच गाडी पुढे गेली होती.

अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला सुमारे 20 मीटर दगड ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे प्रभारी पवन कुमार, आरपीएफचे धनसिंग चौहान, वरिष्ठ विभाग अभियंता दगड ठेवलेल्या रेल्वे ट्रॅकवर घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. यानंतर रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com