Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: थंडी वाढली! राज्यातील तापमानात आणखी घट, कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Winter Season Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिमाण महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे. त्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Priya More

राज्यातील किमान तापमानामध्ये घट होत असून सगळीकडे थंडी हळूहळू वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्रानंतर आता मुंबईत देखील थंडी हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. पहाटे आणि रात्री हवेमध्ये मोठ्याप्रमाणात गारवा जाणवत आहे. अशामध्ये हवामान खात्याने वातावरणात आणखी बदल होणार असल्याचे सांगितले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिमाण महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होणार आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट देखील होणार आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात दिवसाला तापमानात वाढ तर पहाटे आणि रात्री तापमान कमी होण्याची शक्यता आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्यातील तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास तापमानात घट झाल्यामुळे हवेत गारवा जास्त प्रमाणात निर्माण झाला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांसह ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याठिकाणी तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. याचसोबत पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात तापमानाचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे याठिकाणी थंडी जास्तच वाढली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सगळीकडे शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त थंडी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा १०.५ अंशांवर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रात १ ते ३ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. तर पुढच्या ४८ तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT