Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या राजकारणात बंडानंतर दिग्गजांचे गड भुईसपाट झाले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
Published On

भरत मोहळकर-

महाराष्ट्राच्या राजकारणात बंडानंतर दिग्गजांचे गड भुईसपाट झाले. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या विधानसभेच्या निकालातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा शिंदे ब्रँड प्रस्थापित झालाय. तो नेमका कसा? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

CM Eknath Shinde
Maharashtra Politics: माझ्या उधारीसाठी तुम्हीच दिवाणजी व्हा, बाबाजी काळेंनी दिलीप पाटील यांना पराभवानंतर दिली नोकरीची ऑफर

शिवसेनेच्या फुटीनंतर सोबत आलेला एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडेन, असा पणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. तर एकनाथ शिंदेंनी अपवाद वगळता आपल्यासोबत आलेल्या आमदारांना जिंकवून आपला शब्द खरा करत महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे ब्रँड स्थापन केलाय...मात्र महाराष्ट्रात शिंदे ब्रँड स्थापन होण्यामागची कारणं काय आहेत?

CM Eknath Shinde
Maharashtra Politics : नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

महाराष्ट्राचा नवा ब्रँड 'शिंदे'

पुलोदच्या प्रयोगानंतर 1980 मध्ये पवारांच्या 58 पैकी 52 आमदारांनी साथ सोडली

1985 मध्ये 52 पैकी सर्वच आमदार पराभूत झाले

1991 मध्ये भुजबळांसोबत शिवसेना सोडणारे आमदार निवडणूकीत भुईसपाट झाले

1999 मध्ये गणेश नाईकांनी बंड केलं आणि पराभूत झाले

2005 मध्ये राणेंसोबत सेना सोडलेल्यांपैकी कालिदास कोळंबकर वगळता सर्व पराभूत झाले

2006 मध्ये राज ठाकरेंनी सेना सोडल्यानंतर 13 आमदार निवडून आणले. मात्र ते टिकले नाहीत.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics : नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी बंडखोरी केली त्यांना जनतेच्या दरबारात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा जास्तीचा स्ट्राईकरेट राखला.

तर आता विधानसभा निवडणुकीतही शिंदेंनी 80 पैकी 57 जागांवर विजय मिळवून आपलं नेतृत्व सिद्ध केलंय... त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पवार, ठाकरे, फडणवीस यांच्यानंतर शिंदे ब्रँड प्रस्थापित केलाय.. मात्र हा ब्रँड लोकसभा, विधानसभेनंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम राखणार का? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com