विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचे पहायला मिळालं. महायुतीच्या लाटेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडी उद्धवस्त झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकसभेला यश मिळवल्यामुळे शरद पवार यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले होते. मात्र, शरद पवार करिष्मा दाखवण्यास अपयशी ठरले आहेत. पाहूया एक रिपोर्ट..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाप्रणीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 41 जागांवर विजय मिळविला आहे.
याउलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केवळ 10 जागांवर विजय मिळविला आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तब्बल 40 मतदारसंघात आमनेसामने आले होते. त्यामुळे मतदार शरद पवारांची तुतारी फुंकणार की अजित पवारांच्या घड्याळाची वेळ साधणार? याची उत्सुकता होती. मात्र या संघर्षात अजित पवार गटाची सरशी झाली आहे.
घड्याळाची तुतारीवर मात
राज्यात एकूण 40 मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत होती. त्यातील 30 मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षानं बाजी मारली आहे.तर 7 मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षानं विजय मिळविला आहे. तर 3 ठिकाणी या दोन्ही राष्ट्रवादीच्या लढतीत अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी गुलाबी रंगाची निवड केली होती. यासाठी त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेटही घातले होते. या रंगावरून अजित पवार आणि त्यांच्या गटावर बरीच टीका करण्यात आली होती. मात्र आता याच प्रचारामुळे अजित पवारांच्या पक्षाला यश लाभले आहे.
यातल्या काही प्रमुख लढती जाणून घ्या.
बारामती
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
विजयी - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
.........
आंबेगाव
दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
विजयी - दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
...............
मुंब्रा
नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
विजयी -जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
येवला
छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
माणिकराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
विजयी - छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
लोकसभेला शरद पवारांना सहानभुतीची लाट होती. 10 पैकी 8 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे नव्याने पक्ष बांधणी करणाऱ्या शरद पवारांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांना विधानसभेसारखा लोकसभा निवडणुकीत आपला करिष्मा दाखवता आला नाही.
राज्याच्या राजकारणाचा अंदाज ज्यांना आधी येतो, विरोधकांनाही आपल्या चाली कळू न देणारे शरद पवार यांच्यासाठी हा पराभव मोठा आहे. विशेष म्हणजे पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांना अखेरच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे हा आणखी मोठा धक्का मानला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.