Maharashtra braces for stormy weather: IMD forecasts rain, thunder, and gusty winds across multiple districts in the coming days. Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Weather : पुणे-साताऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा, आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

Rain Alerts Across Maharashtra Todayमहाराष्ट्रात आज पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या अंतर्गत भागात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला असून, हवामान खात्याने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि परिसरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होत आहे. यासोबतच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, पाकिस्तान ते बांगलादेश दरम्यान पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे.

कोकणात पावसाने हजेरी लावली असली तरी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात केवळ तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित भागात प्रामुख्याने उघाड राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. स्थानिक प्रशासनाने पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना नदीकाठ आणि डोंगराळ भागात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑरेंज अलर्ट :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

येलो अलर्ट :

पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

येलो अलर्ट :

बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT