Sharad pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांनी पुन्हा डाव टाकला, ५२ जागांवर उमेदवार हेरले, पाहा संभाव्य यादी

Maharashtra Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) शरद पवार यांनी ५२ जागांवर जवळपास उमेदवारी फिक्स केल्याचं समजतेय. जागावाटप पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा केली जाईल.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेला यशाची चव चाखल्यानंतर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेलाही सज्ज झालाय. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि रोहित पवार महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय. एकीकडे मविआमध्ये जागावाटपाची (MVA Seat Sharing) चर्चा सुरू आहे, दुसरीकडे प्रत्येक पक्षाने उमेदवाराची चाचपणी करण्यावर भर दिला. शरद पवार यांनी तर राज्यातील सरकार बदलायचाच, असा चंग बांधलाय. शरद पवारांच्या चक्रव्यूहात सध्या तरी महायुती काहीअंशी अडकल्याचं दिसतं.

मविआच्या जागावाटपात (MVA Seat Sharing) शरद पवार यांना ८० ते ८५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार (Sharad pawar) पुन्हा संधी देतील, यात शंकाच नाही. जे सोडून गेले, त्यांना जाऊ द्या.. आपण नवं नेतृत्व तयार करू... असे म्हणत शरद पवार कामाला लागले. त्यांनी आपल्यासाठी सकारात्मक असलेल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाव्या ५२ मतदारसंघातील उमेदवारांबाबत जाणून घेऊयात.. अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सध्या खालील नावे आघाडीवर आणि चर्चेत आहेत.

शरद पवार यांचे संभाव्य उमेदवार -

  1. बारामती - युगेंद्र पवार

  2. इंदापूर - हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने,अप्पासाहेब जगदाळे

  3. दौंड - आप्पासाहेब पवार, नावदेव ताकवणे

  4. खडकवासला - सचिन दोडके

  5. हडपसर - प्रशांत जगताप, योगेश ससाणे

  6. भोसरी - विलास लांडे, अजित गव्हाणे

  7. आंबेगाव - देवदत्त निकम

  8. शिरुर हवेली - आमदार अशोक पवार

  9. आळंदी - अतुल देशमुख

  10. जुन्नर - शरद लेंडे, अनंतराव चौगुले, तुषार थोरात, मोहित ढमाले

  11. पुरंदर - संभाजीराव झेंडे

  12. कर्जत-जामखेड - रोहित पवार

  13. राहुरी - प्राजक्त तनपुरे

  14. पारनेर - राणी लंके

  15. शेवगाव-पाथर्डी - प्रतापराव ढाकणे

  16. अकोले - अमित भांगरे

  17. श्रीगोंदा - राहुल जगताप

  18. कोपरगाव - विवेक कोल्हे

  19. अहमदनगर शहर - अभिषेक कळमकर, डॉ. आठरे

  20. मोहोळ - राजू खरे, अभिजित ढोबळे, रमेश कदम, संजय क्षीरसागर

  21. सांगोला -दीपक साळुंके, बाबासाहेब देशमुख, दत्तात्रय सावंत

  22. बार्शी - दिलीप सोपल, प्रभाताई झाडबुके

  23. माढा - रणजित शिंदे, रणजित मोहिते

  24. माळशिरस - उत्तमराव जानकर

  25. करमाळा - नारायण पाटील

  26. पंढरपूर - भागीरथ भालके, अनिल सावंत, प्रशांत परिचारक

  27. फलटण - दिगंबर आगवणे, अभय वाघमारे, रमेश आढाव

  28. पाटण - सत्यजित पाटणकर

  29. माण-खटाव - प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप

  30. कोरेगाव - शशिंकात शिंदे

  31. सातारा जावळी - दीपक पवार, शफीक शेख

  32. वाई खंडाळा - मदनदादा भोसले (प्रवेश बाकी), यशराज भोसले

  33. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील

  34. कागल - समरजीत घाटगे

  35. चंदगड - नंदिनी बाभुळकर

  36. राधानगरी-भुदरगड - केपी पाटील, एवाय पाटील

  37. वडगाव शेरी - बापू पठारे

  38. वाळवा-इस्लामपूर - जयंत पाटील

  39. तासगाव - रोहित पाटील

  40. शिराळा - मानसिंह नाईक

  41. आष्टी-पाटोदा - राम खाडे

  42. परळी - राजाभाऊ फड, बबन गीते, फुलचंद कराड

  43. बीड - संदीप क्षीरसागर

  44. केज - पृथ्वीराज साठे, नवनाथ शिंदे

  45. माजलगाव - नारायण डक, मनोहर डाके

  46. अहमदपूर - विनायकराव पाटील

  47. परांडा - राहुल मोटे

  48. घनसावंगी - राजेश टोपे

  49. काटोल - अनिल देशमुख

  50. येवला - अमृता पवार (पक्षप्रवेश बाकी)

  51. मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

  52. मावळ - बाळा बेगडेंना संधी दिली जाऊ शकते

बदनापूर, जिंतूर,वसमत, किनवट, हिंगणा, मोरगाव, अहेरी, कारंजा, हिंगनघाट, नाशिक पश्चिम, दिंडोरी,पुसद, नाशिक मध्य, मुक्ताईनगर, अमळनेर, देवळाईनगर या मतदारसंघातही शरद पवार यांना विजय मिळू शकतो, असं बोललं जातेय. त्याशिवाय कोकण आणि मुंबईमध्येही शरद पवारांना काही जागांवर यश मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT