Maharashtra Vidhan Parishad Election 2024: Saamtv
महाराष्ट्र

BJP MLA Meeting: मतांची फुटाफूट टाळण्यासाठी भाजप 'दक्ष'! आमदारांची घेतली शाळा; कागदावर मतदान करत रंगीत तालीम

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: मतदानात फोडाफोडी, फुटाफूट टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष काळजी घेतली आहे. काल रात्री झालेल्या मिटिंगमध्ये भाजप नेत्यांकडून मतदानाची रंगीत तालीमही घेण्यात आली.

Gangappa Pujari

सूरज मसुरकर| मुंबई, ता. ११ जुलै २०२४

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडून ९ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून महाविकास आघाडीने ३ उमेदवार उतरवले आहेत. उद्या होणाऱ्या या मतदानात फोडाफोडी, फुटाफूट टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष काळजी घेतली आहे. काल रात्री झालेल्या मिटिंगमध्ये भाजप नेत्यांकडून मतदानाची रंगीत तालीमही घेण्यात आली.

उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत फुटाफुट टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सावध पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची विधीमंडळात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुशंगाने महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.

भाजपच्या 5 उमेदवारांना कोणत्या आमदारांनी कोणत्या पसंतीचं मते द्यावीत? मतदान कसे करावे? याबाबतच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी आमदारांची कोऱ्या कागदावर मतदान करुन रंगीत तालीमही घेण्यात आली. मत वाया जाणार नाही, बाद होणार नाही, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीने १ उमेदवार जास्त दिल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. महायुतीकडे ९ उमेदवार निवडून येण्याइतके संख्याबळ आहे. मात्र महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून येणे संख्याबळाच्या दृष्टीने कठीण आहे. केवळ क्रॉस वोटिंग झाले तरच महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

Nandurbar Accident : धनतेरसला भयानक अपघात, सातपुड्यात भाविकांवर काळाचा घाला, ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

SCROLL FOR NEXT