Vidhan Parishad Election: रणनीतीसाठी आमदारांची हॉटेल वारी; कोणत्या पक्षाच्या आमदारांनी कोणत्या हॉटेलवर ठोकलाय मुक्काम?

Maharashtra Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर या १२ उमेदवारांचं भवितव्य काय असेल हे समजेल. तत्पूर्वी सर्व राजकीय पक्षांनी रणनीती बनलीय.
Vidhan Parishad Election: रणनीतीसाठी आमदारांची हॉटेल वारी; कोणत्या पक्षाच्या आमदारांनी कोणत्या हॉटेलवर ठोकलाय मुक्काम?
Maharashtra Vidhan Parishad Election

लोकसभेपेक्षा राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांनी सर्व पक्षांचे टेन्शन वाढवलंय. या निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी पक्षांनी कंबर कसलीय. एकमेकांना चेकमेट देण्यासाठी सर्व पक्षांकडून साम,दामची रणनीती आखली जातेय, यासाठी आमदारांची हॉटेल वारी झाली असून त्यांना तेथेच मुक्काम करावा लागणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून सर्व पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलवर मुक्कामी ठेवत आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपला देखील क्रॉस व्होटिंगची चिंता सतावत असून त्यांनीही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. विधान परिषदेसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्यानं क्रॉस व्होटिंगही होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

त्यामुळे मतदानापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीला आमदार फुटण्याची भीती असल्याने आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये ठेवलाय. हे. भाजप, शिवसेना (ठाकरे), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याचे आदेश दिलेत. ज्या हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे, तेथे उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबत बैठक होणार आहे. दरम्यान याआधी बैठकीआधी मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले.

कोणत्या हॉटेलमध्ये कुणाचा मुक्काम?

भाजपचे आमदार- ताज प्रेसि़डेन्सी आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार- ताज लँड

शिवसेना उबाठा- ITC ग्रँड मराठा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - हॉटेल ललित

सर्व राजकीय पक्ष १२ जुलै रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवत आहेत. पहिल्या पसंतीची मते कोणाला द्यायची आणि दुसऱ्या पसंतीची मेत कोणाला द्यायची याचा प्लान सर्व राजकीय पक्ष ठरवत आहेत.

विधानपरिषद निवडणुकीचे गणित?

विधानसभेचे सध्याचे संख्याबळ २७४ आहे तर एकूण संख्याबळ २८८ आहे. विधान परिषदेची एक जागा जिंकण्यासाठी २३ मतांची आवश्यकता असते. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे ५, शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादीचे २ असे उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. शिवसेनेचा १ उमेदवार, काँग्रेसचा १ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय.

दरम्यान विधासभेत भाजपचे १०३ आमदार आहेत. काँग्रेस ३७, शिवसेना ३८, ठाकरे गट शिवसेना १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार ४० , तर शरद पवार गटाचे आमदार १२ आहेत. छोट्या पक्षाचे आमदारांची १५ आहे, अपक्षांची संख्या १३ आहे.

Vidhan Parishad Election: रणनीतीसाठी आमदारांची हॉटेल वारी; कोणत्या पक्षाच्या आमदारांनी कोणत्या हॉटेलवर ठोकलाय मुक्काम?
Maratha Reservation: आरक्षणावरुन जातीचं राजकारण; सर्वपक्षीय बैठकीत गोंधळ, सभागृह तहकूब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com