Maharashtra Vidhan Parishad Election 2024:  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रेकिंग! विधानपरिषदेसाठी भाजपने १० नावं दिल्ली हायकमांडकडे पाठवली; २ महिला नेत्यांचा समावेश

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: लोकसभा निवडणुका होताच राजकीय वर्तुळात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्र भाजपकडून १० नेत्यांच्या नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

गणेश कवाडे| मुंबई, ता. २८ जून २०२४

लोकसभा निवडणुकानंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी १० नेत्यांच्या नावांची यादी दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या यादीमध्ये दोन महिला नेत्यांचाही समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुका होताच राजकीय वर्तुळात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. पुढील महिन्यात विधान परिषदेच्या १२ जागांसाठी मतदान होणार आहे. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून महाराष्ट्र भाजपकडून १० नेत्यांच्या नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पंकजा मुंडे, अमित गोरखे,परिणय फुके ,सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवीताई नाईक या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजपने विधान परिषदेसाठी सावध पवित्रा घेतला आहे. त्यासाठी लोकसभेत पराभव झालेले पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचे पुनर्वसन करुन मतांचे विभाजन टाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसेच विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जातीय समीकरण करण्याचाही प्रयत्न आहे. यावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT