मोदींचा विरोधकांवर थेट हल्ला! ३० तारखेला संसदेत नेमकं काय घडणार? महिला आरक्षणावरून दिल्लीत मोठा भूकंप!

महिला आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. 'नारी शक्ती'ला दिलेले वचन पूर्ण केले जाईल आणि महिला आरक्षणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला आरक्षणासंदर्भात सरकार कटिबद्ध असून, 'नारी शक्ती'ला दिलेले वचन पूर्ण केले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. डिलिमिटेशन विधेयकाआधी दिल्लीमधील राजकारण तापले आहे. ३० तारखेला हे विधेयक संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे.त्याआदी मॅजिक फिगरची जुळवाजुळव केली जात आहे. मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महिलांना योग्य भागीदारी मिळवून देण्यासाठी अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. आपणही अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील असल्याचे मोदींनी म्हटले. अनेक महिलांनी प्रत्यक्ष भेटून आणि पत्र लिहून हा विषय आपल्यासमोर मांडल्याचा उल्लेख त्यांनी केला.

देशातील सर्व नारी शक्तीचा आशीर्वाद पाठीशी आहे. महिला आरक्षणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष संसद आणि विधानसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत, असे मोदींनी व्हिडिओत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.