Video : विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव; ठाकरेंनी महायुतीचं टेन्शन वाढवलं!

Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
Video
VideoSaam Digital

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. मविआचे तीन आमदार निवडून येतील असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. त्यांनी त्यांची मतं कशी सांभाळायची हा त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणून ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढललंय. लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे मविआच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आता मविआतील तीनही पक्ष सज्ज झाले आहेत.

राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक विधानही केलं आहे.

कुणाकडे किती संख्याबळ ?

महायुतीत असलेल्या

भाजप -103

शिंदे सेना – 37

राष्ट्रवादी (AP) - 39

छोटे पक्ष - 9

अपक्ष - 13

असे एकूण - 201

तर मविआकडे

काँग्रेस - 37

ठाकरे गट - 15

राष्ट्रवादी (SP) - 13

शेकाप - 1

अपक्ष - 1

असे एकूण - 67

तर तटस्थ असलेल्या

एमआयएम - 2

सपा - 2

माकप - 1

क्रां. शे. प. - 1

एकूण - 6

विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे.

Video
Video : फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवेळी लिफ्टमध्ये कोण-कोण होतं? त्यांच्यात नेमकं काय चर्चा झाली? Exclusive Report

महायुती ९ जागा लढवण्यावर ठाम आहे. तर उद्धव ठाकरेंनीही मविआ ३ जागा लढवणार असल्याचं सांगितलंय. जर ऐनवेळी कुणाच्याही एका उमेदवारानं माघार घेतली नाही. तर ११ जागांसाछी होणारी विधानपरिषदेची निवडणूक अटकळ आहे. मात्र यात कोणाची मतं फुटणार आणि कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता असेल.

Video
Nanded News : सावधान! SBI च्या नावाने आलेली लिंक क्लिक केली की मोबाईल होतो हॅक; या जिल्ह्यातील नागरिक हैराण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com