Video : फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवेळी लिफ्टमध्ये कोण-कोण होतं? त्यांच्यात नेमकं काय चर्चा झाली? Exclusive Report

Maharashtra Politics : विधीमंडळाच्या अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता असाताना पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून विधानसभेत गेले. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली.
Video
VideoSaam Digital
Published On

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

अधिवेशनाचा पहिलाच दिवस कामकाजामुळे नव्हे तर कट्टर राजकीय विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनं गाजला. अधिवेशनासाठी विधानसभेत जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लिफ्टबाहेर उभे होते. त्याचवेळी तिथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. मात्र लिफ्ट उपलब्ध नसल्यामुळे दोघे चर्चा करत उभे राहिले. पुढे काय घडलं पाहूया.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस ना विरोधकांच्या आरोपानं गाजला ना सत्ताधाऱ्यांच्या प्रत्युत्तरानं. तो गाजला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीनं. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. ठाकरे-फडणवीस एकत्र येणार का अशाही चर्चा रंगल्या. नेमकं काय घडलं बघा.

लिफ्टमध्ये काय घडलं?

फडणवीस-दरेकर लिफ्टबाहेर उभे होते

उद्धव ठाकरे आणि नार्वेकर लिफ्टजवळ आले

लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी दरेकरांना बाहेर काढायला सांगितलं.

दरेकर म्हणाले की तुम्ही एकत्र येत असाल तर मी बाहेर पडायला तयार आहे.

लिफ्टमध्ये ठाकरे-फडणवीस यांच्यात हास्यविनोद झाले .

लिफ्ट वरती पोहचल्यानंतर ठाकरे-फडणवीस विरूद्ध दिशेनं गेले.

लिफ्टमध्ये कोण-कोण होतं?

देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे

प्रवीण दरेकर

मिलिंद नार्वेकर

प्रसाद लाड

Video
Mumbai Breaking : आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचा DNA झाला मॅच; नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा Video

य़ा भेटीबाबत राजकीय विश्वात चर्चांना उधाण आल्यानंतर ठाकरेंनीही आपल्या खास शैलीत या भेटीबाबत सूचक वक्तव्य केलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्टमध्ये झालेल्या भेटीवरून विविध चर्चा रंगल्या असल्या तरी भाजपनं मनोमिलनाची शक्यका फेटाळून लावलीय. तर शिंदे गटानं राजकीय परंपरेचा दाखला दिलाय. लोकसभा निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतरही फडणवीस आणि ठाकरेंनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. 2019 ला बंद दाराआड झालेल्या चर्चेचा उल्लेख करत दोघांनीही अनेकदा एकमेकांना लक्ष्य केलं.

ठाकरे फडणवीसांनी एकमेकांवर अशी बोचरी टीका केली होती. मात्र महायुती सरकारच्या अखेरच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कट्टर राजकीय विरोधक असलेल्या दोघांनी एकत्र लिफ्टमध्ये प्रवास केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण राजकारणात कुणीच कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. गेल्या पाच वर्षांचा महाराष्ट्रातला राजकीय इतिहास पाहिला तर राजकारणात काहीही होऊ शकतं एवढंच या घटनेनंतर म्हणता येईल.

Video
Nanded News : सावधान! SBI च्या नावाने आलेली लिंक क्लिक केली की मोबाईल होतो हॅक; या जिल्ह्यातील नागरिक हैराण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com